ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

गावच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रामस्थांची एकजुट गरजेची! - संजय मिस्किन Unity Among Villagers is Essential for the Holistic Development of the Village! — Sanjay Miskin माणकेश्वर येथे कर्मवीर परिवारातर्फे गुणगौरव सोहळा संपन्न.

गावच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रामस्थांची एकजुट गरजेची! - संजय मिस्किन

माणकेश्वर येथे कर्मवीर परिवारातर्फे गुणगौरव सोहळा संपन्न.

Unity Among Villagers is Essential for the Holistic Development of the Village!
Unity Among Villagers is Essential for the Holistic Development of the Village!
रंगोली न्युज दि. २२) 
विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषे बरोबरच जर्मन, जापनीज, फ्रेंच इत्यादी भाषेवर प्रभुत्व मिळवावे व जगातील विविध क्षेत्रात यश मिळवावे असे मत संजय मिस्कीन यांनी व्यक्त केले. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधारेवस्ती येथे सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी कर्मवीर परिवार आयोजित "गौरव सोहळा" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन वेळी ते बोलत होते. 

     या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी तालुका कृषी अधिकारी किशोर अंधारे तर प्रमुख पाहुणे म्हणून परंडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी गणेश कुकडे, शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले हे होते. यावेळी बोलताना संजय मिस्किन म्हणाले की, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने येऊन आपले गाव आदर्श करावे. "Unity Among Villagers is Essential for the Holistic Development of the Village!" विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवावे. शिक्षणाचे महत्त्व आणि कर्मवीर परिवारांनी राबविलेले विविध उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. 

[ ] यांचा झाला सन्मान-

संदीप मोरे (केंद्रप्रमुख), विशाल अंधारे (पुणे पोलीस), आरोही सांगडे (नवोदय विद्यालय तुळजापूर), अनया अंधारे (भोसला मिलिटरी स्कूल नाशिक), प्रशांत क्षीरसागर (भारतीय रेल्वे सेवा), सामाजिक व राजकीय क्षेत्रातील साधना (काकी) अंधारे (सदस्य जिल्हा परिषद, धाराशिव) पूजा विशाल ढगे (सभापती, पंचायत समिती भूम) परसू गवारे (उपसभापती, पंचायत समिती परांडा), मनोज अंधारे (सदस्य पंचायत समिती भूम), सुदाम पाटील (जिल्हा अध्यक्ष, कामगार  मोर्चा, धाराशिव), विशाल बापू ढगे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती भूम),

[ ] विशेष सन्मान -

पाणी फाउंडेशन, शिवजल क्रांती, निजाम कालीन शाळा, सकाळ रिलीफ फाउंडेशन, मुलींसाठी जिल्हा वस्तीगृह, इत्यादी क्षेत्रातून भूम परांडा वाशी या तालुक्यात केलेल्या भरीव योगदानाबद्दल कर्मवीर परिवार व ग्रामस्थ यांच्या वतीने पत्रकार संजय मिस्किन यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षण विस्ताराधिकारी सोमनाथ टकले व नूतन केंद्रप्रमुख संदीप मोरे, गणेश महाराज अंधारे, किशोर अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तोडकरी यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राहुल अंधारे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय घोडके यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी भालचंद्र पाटील, प्रवीण अंधारे, ज्ञानेश्वर कातुरे, अशोक बनसोडे, दत्तात्रय गुंजाळ, रत्नदीप अंधारे, अमोल चोपडे, अलका तांबे, मंजुषा सुरवसे, प्रमिला जावळे, विद्या वैद्य, वैजनाथ नरके, दिगंबर मोहिते इत्यादी कर्मवीर परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments