ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तापमानाचा पारा ४०° च्या पार! नागरीकांनी दुपारच्या उन्हातला प्रवास टाळलेला बरा! शेतकऱ्यांची पिकांसह पशुधनाची काळजी घेण्यासाठी कसरत. The mercury soars past 40°!

तापमानाचा पारा ४०° च्या पार!

नागरीकांनी दुपारच्या उन्हातला प्रवास टाळलेला बरा! 

शेतकऱ्यांची पिकांसह पशुधनाची काळजी घेण्यासाठी कसरत.

The mercury soars past 40°!
The mercury soars past 40°!

The mercury soars past 40°! रंगोली न्युज दि. २३) धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरासह तालुक्यात तापमानाचा पारा ४०° ते ४२° च्या वर "The mercury soars past 40°!" जात असून दुपारच्या पाऱ्यात रस्ते ओस पडत आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतातील पिकांसह पशुधनाची काळजी घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

      धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरासह तालुक्यात एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट सुरू झाली असून ४०° ते ४२° तापमानाचा पारा वाढत आहे. तर किमान तापमानही २१° वर गेले आहे. आणखीन किती तापमान वाढेल हे येणाऱ्या मे महिन्यात समजेल. वाढत्या तापमाणामुळे भर दिवसा रस्ते ओस पडण्यास सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आपल्या शेतातिल पिके जगविण्यासाठी अपुऱ्या विजपुरवठ्यामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेती पिकाला अनिश्चीत भाव मिळत असल्याने जगाचा अन्नदाता शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणुन शेळीपालन, कुक्कुटपालन आदी व्यवसायासह दुग्ध व्यवसाय करत असतो. त्या पशुपालनाचे संगोपन करण्यासाठी एप्रिल व मे महिण्यामध्ये शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामध्ये पशु, पक्षी यांचे उष्णतेपासुन संरक्षण करणे, चारा उपलब्ध करणे, त्यांची वेळोवेळी निगा करणे उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांना कसरत 'Farmers struggle to care for both their crops and livestock.' करावी लागते. शेतकऱ्यांची उन्हाळ्यातील ही मोठी कसरत आहे.

 

The mercury soars past 40°!
The mercury soars past 40°!

     दिवसभर उष्णतेच्या झळा तर रात्री उकाडा यामुळे नागरीकांसह लहान मुलांची मोठी तगमग होते. त्यामध्ये अवकाळी वारेकावदान, पाऊसामुळे विजपुरवठा खंडित होतो आणि नंतर मात्र एक मिनीटभरही दम निघत नसल्याने विद्युत वितरन कंपनीच्या कार्यालयातील फोनची घंटा वाजताना थांबता थांबत नाही. 

👉 तापमान - 

परंडा शहरासह तालुक्यात एप्रिल महीण्यात किमान तापमानातही वाढ झाली असून ते २१° गेले आहे. कमाल तापमान जवळपास ४०° ते ४२° तापमान झाले आहे. मग मे महीण्यात आणखी किती वाढेल?

👉 नागरीकांना आवाहन - 

सध्या तापमाणामध्ये वाढ होत असून नागरीकांसह मुलांनी शक्यतो दुपारच्या उन्हामध्ये प्रवास टाळावा. दिवसातुन पुरेसे पाणी प्यावे. थंड ठिकाणी विसावा घ्यावा व आरोग्याची काळजी घ्यावी.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments