धनंजय सावंत यांच्याकडून सिरसाव येथे नुकसानग्रस फळपिकांची पहाणी.
तात्काळ पचनामे करण्याच्या महसुल व कृषि प्रशासनाला सुचना.
![]() |
| Dhananjay Sawant inspects damaged fruit crops at Sirsav. |
रंगोली न्यूज दि. २२)
Dhananjay Sawant inspects damaged fruit crops at Sirsav. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यातील सिरसाव येथे दि. २२ रोजी झालेल्या वादळी वारे व गारपिटीमुळे पपई पिकासह इतर फळबागेचे व शेतीपिकांचे अतोनात नुकसान "Severe damage caused to papaya crops, as well as other fruit orchards and agricultural crops, due to stormy winds and hailstorms." झाले. त्याची दि. २३ रोजी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जवळा नि. गटाचे जि.प. सदस्य धनंजय सावंत यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पहाणी केली व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
परंडा तालुक्यातील सिरसाव येथे झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पपई, पेरू, मका, केळी, आंबा व इतर फळबाग व पिकांचे नुकसान झाले. धनंजय सावंत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तालुका व जिल्हा प्रशासन तहसीलदार, व तालुका कृषी अधिकारी यांना कळविले. झालेल्या फळबागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रत्येक शेतकरी यांच्या पर्यंत मदत करावी व तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना फोनद्वारे संवाद साधून स्वतः फळबागांचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या ठिकाणी उपस्थित नुकसानग्रस्त शेतकरी शहाजी मिसाळ, तानाजी जाधव, नवनाथ मिसाळ, घनश्याम गावकरे, अनिल चौबे, इत्यादी शेतकऱ्यांच्या नुकसान झाले. विक्रीसाठी आलेल्या पपईची बाग भुईसपाट झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी वादळाने हिराऊन घेतला. या झालेल्या नुकसानीच्या वेदना, हळहळ या त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यालाच जास्त माहीत. त्याची धनंजय सावंत यांनी बांधावर जाऊन पाहणी करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.
![]() |
| Dhananjay Sawant inspects damaged fruit crops at Sirsav. |
यावेळी माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष तथा जि. प.सदस्य धनंजय सावंत यांच्यासह माजी जि. प. सदस्य गौतम लटके, जयदेव बप्पा गोफणे, पंचायत समिती सदस्य केदार पाटील, सोमनाथ ढगे, आकाश नवले, कांदलगाव सरपंच मगनदास पवार, आसू सरपंच शशिकांत खुणे, अरणगाव सरपंच युसुफ पठाण, विष्णू सांगडे, भागवत डाकवाले, विकास देवकते, बालाजी कातूरे, महेश अंधारे, बंडू वायकुळे, अभिजीत चोबे, इत्यादी उपस्थित होते. इत्यादी उपस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!