ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भैरवनाथ शुगर सोनारीचा १९ वा बॉयलर अग्नीप्रदीपन व मोळी पूजन संपन्न. यंदाच्या गळीत हंगामात ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; १५ हजार हेक्टर उसाची नोंदणी. Bhairavanath Sugar Gold's 19th Boiler Lighting and Moli Poojan completed.

भैरवनाथ शुगर सोनारीचा १९ वा बॉयलर अग्नीप्रदीपन व मोळी पूजन संपन्न.

यंदाच्या गळीत हंगामात ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; १५ हजार हेक्टर उसाची नोंदणी

Bhairavanath Sugar Gold's 19th Boiler Lighting and Moli Poojan completed.
Bhairavanath Sugar Gold's 19th Boiler Lighting and Moli Poojan completed.

परंडा | दि. ७ ऑक्टोबर २०२६ (रांगोली न्यूज) Bhairavanath Sugar Gold's 19th Boiler Lighting and Moli Poojan completed. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि., सोनारी युनिट क्रमांक १ यांच्या १९ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन व मोळी पूजनाचा शुभारंभ बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन विक्रम सावंत, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत आणि अविनाश वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना चेअरमन अनिल सावंत यांनी भैरवनाथ शुगरकडे गतवर्षी गाळपास आलेल्या ऊसाला प्रति मेट्रिक टन २,८०० रुपये प्रमाणे ऊस बिल अदा करण्यात आले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी भैरवनाथ शुगरला चांगल्या प्रतीचा ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चालू गळीत हंगामात ५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची नोंदणी झाली असल्याची माहितीही अनिल सावंत यांनी दिली. कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला योग्य दर देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखान्याची भूमिका.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांनी भैरवनाथ शुगर सोनारी कारखान्याच्या वाटचालीबाबत माहिती दिली. या भागातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच ऊस वाहतुकीसह गाळप व्यवस्थेला चालना देण्यासाठी सन २००८-०९ मध्ये भैरवनाथ शुगर सोनारी या पहिल्या युनिटची स्थापना करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांनाही सातत्याने प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींचे मोफत विवाह करून देण्यात आले आहेत. तसेच भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला असून, विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.

या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस भैरवनाथ शुगरला देऊन कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंके, परंडा तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, परंडा न.प. नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, भैरवनाथ तालीम संघाचे अध्यक्ष पै. नवनाथ (अप्पा) जगताप, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, आरपीआय प्रदेश सचिव संजयकुमार बनसोडे, माजी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, सभापती भूम पं.स. विशाल ढगे, जि.प. सदस्य अमर मोरे, पं.स. सदस्य अमोल नलवडे, समाधान सातव, तानाजी कोलते, अशोक गायकवाड, प्रशांत काका मुंढेकर, शंकर सुबुगडे, विशाल नाना देवकर, माउली गोडगे, राजेंद्र काका सूर्यवंशी, वैभव पवार, शाम मोरे, नागेश मांजरे, दत्ता महाराज रणभोर, शशिकांत पाटील, विभीषण काळे, बालाजी गुंडाळ, सुभाष देवकते, कृष्णा गोपाळकर, अंगद आबा फरतडे, धोंडीराम फले, गुलाब शिंदे, शिवहरी वारे, सतीश मेहेर, चेतन बोराडे, बापूसाहेब दबडे आदी शिवसैनिक, ऊस उत्पादक शेतकरी व ऊस वाहतूकदार उपस्थित होते.

कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ढोबरे, खाते प्रमुख हनुमंत जाधव, अजित भोसले, रविकांत सिंग, गोविंद कुलकर्णी, दादासाहेब बोरकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ईडीपी मॅनेजर सुभाष भोसले यांनी केले. बॉयलर अग्नीप्रदीपन व मोळी पूजनाच्या या कार्यक्रमामुळे आगामी गळीत हंगामाला उत्साहात सुरुवात झाली असून, यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.

👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments