परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथे १२ ऑक्टोबर रोजी ‘सेवा संकल्प अभियान’!
छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन; विविध शासकीय सेवा, प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार.
![]() |
| AI Image - 'Seva Sankalp Abhiyan' at Pachpimpla in Paranda Taluka on October 12! |
परंडा, दि. ९ (रंगोली न्यूज) 'Seva Sankalp Abhiyan' at Pachpimpla in Paranda Taluka on October 12! राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय सेवा, प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी परंडा तालुक्यातील पाचपिंपळा मंडळ विभागात सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, परंडा (संकीर्ण विभाग) यांच्या दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्याचे आले आहे. त्यानुसार परंडा तालुक्यातील मंडळ विभाग पाचपिंपळा येथे हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा व प्रमाणपत्रे तसेच इतर विभागांच्या शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासकीय कामांसाठी नागरिकांना होणारी धावपळ कमी करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
परंडा तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे आणि विविध शासकीय प्रमाणपत्रे व योजनांसंदर्भातील सेवा मिळवून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार निलेश काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंडळ विभाग पाचपिंपळा येथे उपस्थित राहावे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳पहाण्यासाठी हक्काच "रंगोली न्युज" डिजीटल मिडीया वेब पोर्टल.
👉 रंगोली News 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!