ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी येथे १०१ दात्यांनी केले रक्तदान. ... 101 donors donated blood at Bhairavnath Sugar Works Ltd., Sonari.

भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी येथे १०१ दात्यांनी केले रक्तदान. ...

101 donors donated blood at Bhairavnath Sugar Works Ltd., Sonari.

101 donors donated blood at Bhairavnath Sugar Works Ltd., Sonari.
101 donors donated blood at Bhairavnath Sugar Works Ltd., Sonari.

परंडा - रंगोली न्युज दि. १६) परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री, तथा परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी चे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विकम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०१ दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन डिस्टीलरी मॅनेजर अजित भोसले यांचे शुभहस्ते करण्यात आले.

[ ] रक्तदानाची गरज - 

आजच्या काळात रूग्णांना रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. एका व्यक्तीने केलेले रक्तदान तीन व्यक्तींचे प्राण वाचवू शकते. हाच उदात्त विचार समोर ठेवून भैरवनाथ शुगर वर्क्स लि. सोनारी च्या वतीने आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. सदर शिबीरामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन बार्शी येथील भगवंत ब्लड बैंक यांनी केले.

   यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, चिफ केमिस्ट दादासाहेब बोरकर, मुख्य शेती अधिकारी बापुसाहेब देशमुख, चिफ इंजिनिअर रविकांत सिंग, इलेक्ट्रीकल मॅनेजर, उदयसिंह गडगे, स्टोअर किपर लांडगे, हेड टाईम किपर सुरेश साळुंके, ऊस पुरवठा अधिकारी आबा अनवणे, ऊस पुरवठा अधिकारी गणेश गरदाडे, संदिप कवठे, बालाजी लोंढे, परमेश्वर घळके, लक्ष्मण ढगे तसेच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. .... 

Post a Comment

0 Comments