ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परंडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. ... लोक आदालतीमध्ये दावा दाखल पूर्व ४६३ प्रकरणे तडजोडीने निकाली. ... न्यायाधीश यांनी दिव्यांग दांपत्याकडे जाऊन चौकशी करून तडजोडीत निकाली काढले. ... 463 pre-litigation cases settled through compromise at the Lok Adalat.

परंडा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. ...

लोक आदालतीमध्ये दावा दाखल पूर्व ४६३ प्रकरणे तडजोडीने निकाली. ...

न्यायाधीश यांनी दिव्यांग दांपत्याकडे जाऊन चौकशी करून तडजोडीत निकाली काढले. ...

463 pre-litigation cases settled through compromise at the Lok Adalat.
463 pre-litigation cases settled through compromise at the Lok Adalat.

463 pre-litigation cases settled through compromise at the Lok Adalat. परंडा- रंगोली न्युज दि. १४) मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवार दि. १४ मार्च रोजी आयोजित केलेल्या परंडा न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

     आयोजीत लोक आदालतीमध्ये दावा दाखल पूर्व ४६३ प्रकरणे तडजोडीने मिटली असून तब्बल ५० लाख रुपयांची वसुली झालेली आहे. तसेच प्रलंबित दिवाणी दावे ४९, चेक संदर्भातील व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे २५ देखील तडजोडीने मिटलेली आहेत. या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये हिंगणगाव बु., ता. परांडा येथील मुंडे दांपत्य दिव्यांग असल्याने पुरूषास चालता येत नव्हते, तर पत्नी महिलेस दृष्टी नसल्याने कसलेही दिसत नव्हते. याचे गांभीर्य ओळखून दिवाणी न्यायाधीश व स्तर ए. ए. शेख साहेब व दिवानी न्यायाधीश क.स्तर ए. एन. निवडंगे मॅडम यांनी स्वतः बाहेर चालत जाऊन व त्यांची चौकशी करून सदरील प्रकरण तडजोडीने यशस्वी केले. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त झाले.          

      राष्ट्रीय लोक आदलाठी मध्ये तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉक्टर एफ. ए. एम. ख्वाजा साहेब दिवाणी न्यायाधीश व स्तर ए. ए. शेख, दिवाणी न्यायाधीश क. स्तर डी.जे. जगताप व ए. एन. निवडुंगे यांनी लोक अदालती मधील प्रकरणे खेळीमेळीने व तडजोडीने मीटविल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाचल्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. .... 

Post a Comment

0 Comments