बावची विद्यालयात येथे डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान पुरस्कार आढावा बैठक संपन्न. ...
A review meeting for the Dr. C.V. Raman District-Level Science Awards was held at Bavchi Vidyalaya.
![]() |
| A review meeting for the Dr. C.V. Raman District-Level Science Awards was held at Bavchi Vidyalaya. |
परंडा - रंगोली न्युज दि. १४) डॉ. सी. व्ही. रमण यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविषयी धाराशिव जि.प. उपशिक्षणाधीकारी संतोष माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परंडा तालुक्यातील बावची विद्यालय, परंडा येथे जिल्हास्तरीय विज्ञान पुरस्कार सन २०२५-२६ संदर्भातील आढावा बैठक संपन्न झाली.
प्रमुख पाहुणे धाराशिव जि.प. उपशिक्षणाधीकारी संतोष माळी यांच्यासह धाराशिव जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष रविंद्र स्वामी उपस्थित होते. बावची विद्यालयाच प्राचार्य नारायण खैरे, माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेळगाव प्राचार्य पी.एस. कुमटकर, विज्ञान मंडळ परंडा तालुका अध्यक्ष बालासाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान पुरस्कार २०२५-२६ संदर्भातील विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी शाळांमध्ये विज्ञानविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी विविध समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील नियोजन, जबाबदाऱ्या आणि समन्वय यावर चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुणे संतोष माळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संदीप पालके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि विज्ञानविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावेत असे मत व्यक्त केले. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन गनी पठाण यांनी केले, तर आभार बालाजी काळे यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!