परंडा नगर परिषद ची सर्वसाधारन सभा संपन्न. ...
दैनंदीन व आठवडी बाजार कर वसुली ई-निवेदाव्दारे ठेका देण्यास मंजुरी. ...
Approval granted to award the contract for the collection of daily and weekly market taxes through e-tendering.
![]() |
| Approval granted to award the contract for the collection of daily and weekly market taxes through e-tendering. |
यावेळी परंडा नगर परिषद च्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली, कार्यालय अधिक्षक जगदिश सोंडगे, मुनीर जिकरे यांच्यासह उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर व सत्ताधारी व विरोधी नगरसेवक उपस्थित होते.
आयोजित सर्वसाधारन सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले. यामध्ये आर्थिक वर्ष सन २०२६ २०२७ मध्ये परंडा शहरातील दैनंदीन बजार व आठवडी बाजार भरवणेचा कर वसुली लिलाव करणेबात चा विषय सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये कर वसुली बाजार लिलाव झाल्यानंतर लिलाव धारक याचेकडून बाजारातील लहान मोठे विक्रेते, भाजीपाला विक्रेते शेतकरी यांचेकडून मंजूर दरापेक्षा अधीकचा कर लाऊन रक्कम वसुल केली जाते. त्यामुळे, सर्वसामान्य भाजीपाला विक्रेते शेतकरी, इतर लहान मोठे व्यापारी यांची मोठी पिळवणुक होते. त्यासाठी बाजार लिलाव न करता न.प. कर्मचाऱ्यांकडून कर गोळा करण्यात यावा असे मत उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, रमेशसिंह परदेशी, अनिल शिंदे, परवीन मन्नान बसले यांनी मांडले. त्यावर नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी न.प. मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांना विरील विषयी अभिप्राय देण्याचे सांगीतले. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी सदरची दैनंदीनी बाजार व आठवडी बाजार कर वसुली करणेसाठी कार्यालयाकडे पुरेशे मनुष्यबळ नाही. तसेच इतर यंत्रणेकडून मनुष्यबळ नियुक्ती करून त्याचे नियंत्रण व त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांकडून वसुली करणे शक्य होणार नाही व परिणामी नगर परिषद च्या उत्पंन्नामध्ये घट होईल असे मत मांडले. वरील विषयावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर दैनंदिनी व आठवडी बाजार कर वसुली लिलाव शासन संकेतस्थळावर ई-लिलाव करण्याचे ठरले व ठरव बहूमताने मंजुर करण्यात आला. त्यामुळे अखेर दैनंदिनी बाजार व आठवडा बजार कर वसुली ठेका देण्यास अखेर मंजुरी देण्यात आली.
तसेच यामध्ये आर्थिक वर्ष सन २०२६ २०२७ मध्ये आवश्यक साहीत्य व सेव पुरविणेबाबत निविदा मागविणे बावत चर्चा झाली. त्यामध्ये पाणीपुरवठा विभाग, भांगर विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग आदीसाठी लागणारे साहीत्य व सेवा पुरविणेसाठी आवश्यकते नुसार येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये निवीदा काढणे बाबत एकमत झाले व ठराव मंजुर झाला. त्यास सुचक रमेशसिंह परदेशी तर अणुमोदक सत्तार गुलाव खान पठाण हे होत. तसेच इतर आवश्यक विषय सभेमध्ये घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करून ठराव एकमताने मंजुर करून इतर आवश्यक विषयांना मंजुरी देण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!