ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

ग्लोबल शिक्षण संस्थेमध्ये जीवनराव गोरे यांचा यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा. ... Jeevanrao Gore's memories of Yashwantrao Chavan were revived at the Global Education Institute. ...

ग्लोबल शिक्षण संस्थेमध्ये जीवनराव गोरे यांचा यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा. ...

Jeevanrao Gore's memories of Yashwantrao Chavan were revived at the Global Education Institute. ...

Jeevanrao Gore's memories of Yashwantrao Chavan were revived at the Global Education Institute. ...
Jeevanrao Gore's memories of Yashwantrao Chavan were revived at the Global Education Institute. ...

परंडा - रंगोली न्युज दि. १२) महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंती निमित्त परंडा तालुक्यातील ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्युट येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे दि. १२ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई जिल्हा केंद्र धाराशिव यांच्या वतीने जि.प. धाराशिवचे मा. अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      कार्यक्रमानिमीत्त प्रमुख वक्ते म्हणून आर.पी. कॉलेज धाराशिवचे प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रमेश दापके उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डिसीसी बँक धाराशिवचे मा. संचालक ॲड. सुभाष मोरे, जि. प. धाराशिवचे माजी उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरसडे, आशा मोरजकर, देवानंद टकले, अगंद धुमाळ, दिलीप शेरे, रवी मोरे, गोरख मोरजकर, निशिकांत क्षिरसागर, प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे, प्रा. शक्तीराज माने आदी उपस्थित होते.

Jeevanrao Gore's memories of Yashwantrao Chavan were revived at the Global Education Institute. ...
Jeevanrao Gore's memories of Yashwantrao Chavan were revived at the Global Education Institute. ...

       कार्यक्रमाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या  प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. आशा मोरजकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून  सामाजिक कार्य व परंडा तालुक्यातील शैक्षणिक परस्थिती आढावा सादर केला. मा. प्रा. रमेश दापके यांनी उपस्थितांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी आपल्या भाषणातून यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात आदरणीय जीवनराव गोरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील काही आठवणी ताज्या केल्या. शेवटी दिलीप शेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व आकांक्षा देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.

आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. .... 

Post a Comment

0 Comments