ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जवळा नि. येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन. ... Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsw Samadhan Camp organized at Jala Ni. ...

जवळा नि. येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन. ... 

नागरीकांनी शिबीरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन. ... 

Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsw Samadhan Camp organized at Jala Ni. ...

Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsw Samadhan Camp organized at Jala Ni. ... परंडा - रंगोली न्युज दि. १२) जिल्ह्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान सुरू आहे. शनिवार दि. १४ रोजी जवळा नि. येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, भूम उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन केले असून महसुल मंडळातील नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन परंडा तहसिलदार निलेश काकडे यांनी केले आहे.

      राज्य शासन निर्देशानुसार धाराशिव जिह्यासह परंडा तालुक्यामधील ६ महसुल मंडळ व परंडा शहरामध्ये अशा ७ टप्प्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील शनिवार दि. १४ रोजी परंडा तालुक्यातील जवळा नि. येथील श्री. विठ्ठल मंदीर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

       शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरूस्ती, डिजिटल ७/१२, ८-अ उतारा वाटप, उत्पंन्न, रहिवाशी, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नविन व्यवस्थापनानुसार 'सनदी' प्रक्रियेची माहीती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंगणाबाबतच्या प्रकरणाचा निपटारा आदी नागरी अशा विविध महसुली सेवा पुरविणे हा या अभियाना चा उद्देश असून नागरीकांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन महसुली कागदपत्राच्या त्रुटी व महसुली योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. .... 

Post a Comment

0 Comments