ब्रम्हगांव जि.प.शाळेमध्ये महिला मेळावा संपन्न. ... Women's gathering held at Bramhagaon ZP School.
![]() |
| Women's gathering held at Bramhagaon ZP School. |
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, सरणवाडी शाळेचे मुख्याध्यापक राजेश पडवळ, अंगणवाडी ताई सविता येवले, टाटा कंपनीच्या क्लस्टर असोसिएट प्रज्ञा वाघमोडे, मु.अ. लहु मासाळ, सुष्मा चव्हाण, अपेक्षा ओव्हाळ, संगिता भोसले, अल्का ओव्हाळ व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माॅसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागतगीत गायन करुन स्वागत केले.
यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी ताई सविता येवले, दिपाली वाघमारे, रोहिणी सांगडे, संगिता भोसले, सुषमा चव्हाण, अपेक्षा ओव्हाळ, माधुरी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तर आशा मोरजकर यांनी आपल्या भाषणात महिला सबलीकरण, महिलांची प्रत्येक क्षेत्रातील प्रगती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर खूप बहुमोल मार्गदर्शन केले. आजच्या ग्रामीण भागातील महिलांनी आत्मविश्वासाने सर्व क्षेत्रात सहभागी होणं गरजेचं आहे.
प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या यशामागे पुरुषांची साथ असते त्यामुळे महिलांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी बळ मिळते.
कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अपेक्षा ओव्हाळ यांचा शाळेतील कार्यकाल संपल्याने त्यांना आशा मोरजकर व उपस्थित मान्यवरांचे हस्ते साडी,शाल, श्रीफळ,पुष्पहार गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा ओव्हाळ यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मु.अ. लहु मासाळ यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!