बावची विद्यालयामधील विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन. ...

Encouragement to students participating in the science exhibition at Bavchi Vidyalaya.
Encouragement to students participating in the science exhibition at Bavchi Vidyalaya. परंडा - रंगोली न्युज दि. १०) बावची विद्यालय, परंडा येथील विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध मॉडेल्स व प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टीकोन व कल्पकता दाखवून दिली होती. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतीने बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मु.अ. नारायण खैरे यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये इयत्ता ५ वी मधून :- प्रथम क्रमांक डोके राज प्रमोद व बुलबुले युवराज संतोष (Magic Ball), द्वितीय क्रमांक शेख मोहम्मद नवाज मुदस्सर व जेधे कुबेर आकाश (Phases of Moon), तृतीय क्रमांक शिंदे भार्गवी महेश (Life Cycle of Plant) यांनी मिळविला.
इयत्ता ६ वी मधून : - प्रथम क्रमांक वळवी शौर्य सुरज, दोरगे समर्थ दिपक, तिंबोळे संग्राम दादासाहेब व शेख सलमान (How to Prevent Accident), द्वितीय क्रमांक शिंदे तन्मय बालाजी, बुलबुले संस्कार सागर, मशायक मुस्तकिम मुज्जमिल व राऊत दिग्विजय युवराज (Traffic Signals), तृतीय क्रमांक भिस्ते सार्थक व जाधव ऋतुराज (Water Fall) यांनी मिळविला.
इयत्ता ७ वी मधून :- प्रथम क्रमांक संभव शंकर पवार व अभिनव लक्ष्मण ढगे (Air Filtering), तर द्वितीय क्रमांक अक्षरा माधव तिडके, मृण्मयी अभय कुलकर्णी, श्रावणी अमोल पोळ व श्रद्धा दत्ता कांबळे (A Blind Stick) यांनी मिळविला.
इयत्ता ८ वी मधून :- प्रथम क्रमांक क्षिरसागर सोहम कांतीलाल व काशीद वेदांत धनाजी (Laser Security System), तर द्वितीय क्रमांक बुरंगे आदर्श दत्तात्रय (Solar Electric Power Plant) यांनी मिळविला.
प्रोत्साहनपर बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी सर्व विज्ञान शिक्षक, इतर शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!