स्वयम् शिक्षण प्रयोग व एल.आय.सी लिडर यांच्या वतीने महिला कर्तृत्वाचा सन्मान. ...

Women's achievements honored by Swayam Shikshan Peryo and LIC Leader.
Women's achievements honored by Swayam Shikshan Peryo and LIC Leader. परंडा - रंगोली न्युज दि. १०) स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवणाऱ्या आणि संकटांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनचे औचित्य साधुन परंडा येथे दि. १० रोजी महिला व बालकल्याण विभाग चे CDPO गणेश कुकडे, पंचायत समिती विशेष घटक योजनेने चे सुरज बोडके, गणेश नेटके, प्रेमागोपालन कंपनी च्या CEO सिमा सय्यद, LIC तालुका समन्वयक श्रीमती मुजावर, श्रीमती शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
स्त्री शक्तीचे महत्त्व- "स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व अशा शब्दात महिला व बालकल्याण विभाग चे अधिकारी गणेश कुकडे यांनी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर क्षितिजाकडे झेप "तू नारी, तू घे भरारी, व्यापून टाक क्षितिजे सारी असे कृषी विस्तार अधिकारी सुरज बोडके यांनी संबोधित केले. आयुष्यातील सर्व आव्हानांवर मात करणाऱ्या प्रत्येक स्त्री ला मानाचा मुजरा अशा प्रकारे महिलांचा सन्मान शब्दरूपी करून सिमा सय्यद यांनी जगासाठी प्रेरणा "जगाला एक सुंदर आणि चांगले स्थान बनवणाऱ्या सर्व सामर्थ्यवान महिलांना प्रेम, शक्ती आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या.
![]() |
| Women's achievements honored by Swayam Shikshan Peryo and LIC Leader. |
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश नेटके यांनी केले तर आभार प्रदर्शन गटाच्या लिडर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन स्वयम् शिक्षण प्रयोग व LIC लिडर अन्नपूर्णा ठोसर, प्रेरिका प्रिया हजारे, लिडर कामिनी वरपे, सोनाली पाटील, विमल सुरवसे, विद्या लिमकर, कवठे मॅडम, सुतार मॅडम, कदम मॅडम, मोरे मॅडम आदी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!