शिवसेनेच्या सभापती पदी अर्चना जाधव तर उपसभापती पदी परसु गवारे यांची परंडा पंचायत समितीवर निवड. ...
शिवसेनेचा परंडा पंचायत समितीवर भगवा फडकला. ...
![]() |
| Archana Jadhav was elected as the Shiv Sena president and Parasu Gaware as the deputy president of the Paranda Panchayat Samiti. |
माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली बहुमत असलेल्या परंडा पंचायत समितीवर शिवसेना (शिंदे गटा) चा भगवा फडकला आहे. दि. ६ मार्च रोजी झालेल्या निवडीनंतर सर्व समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी निवडीनंतर नूतन सभापती सौ. अर्चना जाधव व उपसभापती परसू गवारे यांचा सत्कार करण्यात आला.
पं.स.गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी सभापती जाधव व उपसभापती गवारे यांचा पदभार घेल्यानंतर सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, ॲड. सुभाष मोरे, पै. नवनाथ जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, मेघराज पाटील, श्याम मोरे, उद्योजक राजाभाऊ शेळके, बिभिषण रोडगे, गणेश कोकाटे, वाजीद दखनी, संजय घाडगे, विशाल देवकर, माऊली गोडगे, वैभव पवार, नागेश मांजरे, दत्ता रणभोर, कानू सरपणे, दिलीप रणभोर, शुक्राचार्य ढोरे, दिपक भापकर, गणेश नेटके, बालाजी नेटके आदि उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, मांजरा प्रकल्प) श्रीकांत पाटील यांनी पिठासीन अधीकारी म्हणुन काम पाहीले. त्यांना तहसिलदार निलेश काकडे, गटविकास अधीकारी विनोद जाधक, पु. अ. मिलींद पराळे यांचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!