ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पंचायत समिती सभापती, उपसभापती कोण? आज होणार स्पष्ट. ... Who will be the Panchayat Samiti Chairman and Deputy Chairman? It will be clear today.

पंचायत समिती सभापती, उपसभापती कोण? आज होणार स्पष्ट. ...

Who will be the Panchayat Samiti Chairman and Deputy Chairman? It will be clear today.
Who will be the Panchayat Samiti Chairman and Deputy Chairman? It will be clear today.

Who will be the Panchayat Samiti Chairman and Deputy Chairman? It will be clear today. परंडा - रंगोली न्युज दि. ६) परंडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची आज निवड होणार असून पंचायत समितीचा कारभार हाकण्यासाठी दुपारी २ वाजता नुतन सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

       धराशिव जिल्ह्यातील परंडा पंचायत समितिची दि. ९ फेब्रुवारी रोजी सार्वत्रीक निवडणुक पार पडली. या नवनिर्वाचित सदस्यांमधून सभापती व उपसभापती पदाची आज दि. ६ रोजी निवड होणार आहे. परंडा पंचायत समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीची सभा पिठासन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, मांजरा प्रकल्प) श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. आज दि. ६ रोजी दुपारी १२ वा. पर्यंत नामनिर्देशन प्रक्रीया होणार असून, तर दुपारी २ वा. नुतन सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

        परंडा पंचायत समितीसाठी दि. ९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ६, राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजपा १ व शिवसेना (ठाकरे गट) १ असे उमेदवार निवडून आले आहेत. परंडा पंचायत समितीच्या १० सदस्यांपैकी ६ सदस्य हे शिवसेना (शिंदे गट) यांचे निवडून आले असल्याने सभापती व उपसभापती हे शिवसेना शिंदे गट यांचेच होणार असल्याच दिसत आहे. परंडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदावर कोणाला स्थान द्यायचे हे आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत हे निश्चित करणार आहेत. आज दुपारी २ वा. नंतर परंडा प. स. सभापती व उपसभापती कोण हे स्पष्ट होणार आहे.

[ ] यांच्या नावांची चर्चा. ...

सभापती पदासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या पत्नी अर्चना जाधव, विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तानाजी कोलते यांच्या मातोश्री मालनबाई कोलते व रेश्मा गायकवाड यांची नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत. तर उपसभापती पदासाठी समाधान नलवडे, परसू गवारे, व बापूराव भिलारे यांची नावे चर्चेत आहेत.

Post a Comment

0 Comments