ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बावची विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन संपन्न. ... Science exhibition held at Bavchi Vidyalaya on the occasion of National Science Day.

बावची विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन संपन्न. ...

गट वि.अ. विनोद जाधव यांची विद्यार्थ्यांच्या  वैज्ञानिक प्रयोगाला प्रोत्साहन. ...

Science exhibition held at Bavchi Vidyalaya on the occasion of National Science Day.
Science exhibition held at Bavchi Vidyalaya on the occasion of National Science Day.

Science exhibition held at Bavchi Vidyalaya on the occasion of National Science Day.
परांडा - दि. ६) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

      बावची विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पं.स. गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रयोगामागील संकल्पना समजून घेतल्या व अनेक प्रश्न विचारत विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने वैज्ञानिक चर्चा केली.

    आपल्या मनोगतात जाधव यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वतःच्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी व परिश्रम यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, असा संदेश दिला.

Science exhibition held at Bavchi Vidyalaya on the occasion of National Science Day.
        कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात विज्ञान विषयाचे अध्यापन करणारे शिक्षक सचिन मोरे, प्रमोद डोके, पुजा रोडगे, संभाजी खैरे, सौ. आर.आर. गरड, शुभम रोडगे, सौ. पी.जी. गोडगे, सौ. शिवानी पाटेकर, सौ. पी.एम. गाडे या शिक्षकांचा गट विकास अधिकारी, पंचायत समिती परंडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     यावेळी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे तसेच विद्यालयातील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा उत्साह यांचे कौतुक केले. कार्यक्रमास विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे, मु.अ. नारायण खैरे व इतर शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com





Post a Comment

0 Comments