परंडा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन. ...
नागरीकांनी शिबीरामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा! ... तहसिलदार निलेश काकडे
Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj Self-Satisfaction Camp organized in Paranda taluka. परंडा - दि. ४) महसूल विभागाच्या महत्त्वाच्या सेवा जनतेला एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार परंडा तालुक्यात दि. ७ मार्च ते १५ मे या कालावधीमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
परंडा तहसिलदार निलेश काकडे यांनी दिलेल्या माहीतीनुसार परंडा तालुक्यातील प्रत्येक महसुली मंडळ व परंडा नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ७ मार्च रोजी आसू, दि. १४ मार्च रोजी जवळा नि., दि. २८ मार्च रोजी अनाळा, दि. १० एप्रील रोजी शेळगाव, दि. १७ एप्रील रोजी सोनारी, ८ मे रोजी परंडा व १५ मे रोजी पाचपिंपळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरूस्ती, डिजिटल ७/१२, ८-अ उतारा वाटप, उत्पंन्न, रहिवाशी, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नविन व्यवस्थापनानुसार 'सनदी' प्रक्रियेची माहीती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंगणाबाबतच्या प्रकरणाचा निपटारा, घरांसबधी पट्टेवाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषी परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केले जाणार. तसेच बळीराजा पाणंद रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्यांचे जे पाणंद रस्ते आहेत, त्याला क्रमांक देणे, सर्व रस्त्यांचे मोजमाप करणे, सर्व रस्ते खुले करणे. अशा विविध महसुली सेवा पुरविणे हा या अभियाना चा उद्देश असून नागरीकांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन महसुली कागदपत्राच्या त्रुटी व महसुली योजनांचा लाभ घ्यावा तसेच अधीक माहीती साठी ग्राम महसुल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परंडा तहसिलदार निलेश काकडे यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!