आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूलमध्ये स्नेहसमेंलन संपन्न. ....
स्नेहसंमेलनातुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव. ...
A felicitation function was held at Royal Public School, Anala. परंडा - दि. ३) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूलमध्ये दि. २ फेब्रुवारी रोजी वार्षीक स्नेहसमेंलन कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष मोरे, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, बालप्रकल्प विकास अधिकारी गणेश कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सुभाष मोरे, संस्थेचे अध्यक्ष निशीकांत क्षिरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश सह सचिव सौ आशाताई मोरजकर, रॉयल पब्लिक स्कूल च्या संस्थापक सचिवा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर आंबी पोलीस ठाण्याचे स.पो. नि. गोरक्षणाथ खरड, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरख मोरजकर, ज्योतीताई धनजंय सावंत, आनाळा नगरीच्या सरपंच आंबिकाताई क्षिरसागर, माजी उपसरपंच पै. दादा फराटे, पुणे येथील उदयोजक संदेश तापकीर, उद्योजक विक्रम पाटोळे, समाज सेवक अनिल शिंदे, कु. सखी धनजंय सावंत, बचत गटाच्या प्रेरीरीका सौ. नौशाद अलीम शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष निशीकांत क्षिरसागर, सचिवा प्रियंका क्षिरसागर, प्रशांत क्षिरसागर, नारायण क्षिरसागर, सौ मिनाक्षी क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
स्नेहसंमेलना विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लावणी, भक्तीगीते, पर्यावरणावर पाणी यावर प्रकाश टाकणारी गिते, छत्रपती संभाजी महाराजांची थीम या सह हिंदी मराठी गीतांचे सादरीकरण करूण उपसस्थितांची मने जिंकली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रोत्साहनपर रोख रक्कम बिक्षीस म्हणून मिळवीली. कार्यक्रमास मोठया प्रमाणात पालक विद्यार्थी हितचिंतक उपसस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत जगताप, उषा क्षिरसागार, प्रिया देशमुख, कविता जगताप, करिश्मा शेख, ज्योती शिंदे, रुतुजा बोंद्रे, पुजा गरड, कु श्वेता क्षिरसागर, घाडगे, बालाजी गरड, बाबासाहेब गायकवाड, आंबादास गायकवाड, भाऊ हिवरे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!