ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संत मीरा पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. ... National Science Day celebrated at Sant Mira Public School.

संत मीरा पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. ...

National Science Day celebrated at Sant Mira Public School.
National Science Day celebrated at Sant Mira Public School.

परंडा दि. २) परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानाधारित उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवुन दि. २८ फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

      कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तदनंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारी भाषणे सादर केली. विज्ञानामुळे दैनंदिन जीवनात झालेली प्रगती, संशोधनाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याची गरज यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी विचार मांडले. या निमित्ताने शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सौरमाला, जलचक्र, प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा बचत, पावसाचे पाणी साठवणूक, रोबोटिक्स आदी विषयांवरील आकर्षक मॉडेल्स सादर केली. लहान गटातील विद्यार्थ्यांनी सोपे व रंजक प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. 

National Science Day celebrated at Sant Mira Public School.
National Science Day celebrated at Sant Mira Public School.
      मु.अ. संतोष भांडवलकर यांनी आपल्या मनोगतात विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारण्याची सवय लावावी आणि नवनवीन शोधासाठी प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयांचे तज्ञ शिक्षक सुमित कोकाटे, अश्विनी मोरे, सोनाली क्षीरसागर, प्रमोद जाधव, निमराह लांडगे व समाधान शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन देत  कल्पकतेचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी नांगरे तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. विज्ञान दिन सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

Post a Comment

0 Comments