जिजामाता शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा. ....
National Science Day celebrated at Jijamata School. परंडा - दि. २) जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर परांडा येथे दि २८ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मु. अ. सत्यजित घाडगे यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मु. अ. सत्यजित घाडगे यांनी उपस्थित असलेल्या १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना डॉक्टर सी. व्ही. रामन यांनी भौतिक शास्त्रात लावलेल्या शोधाविषयी माहिती सांगितली. आजचे युग हे विज्ञान युग असून आपण अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानाचा अभ्यास करून क्रांती करावी असे संबोधित केले. ५ वी, ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्र या विषयावर नवनवीन ६३ प्रयोग सादर केले. यामध्ये मंगळयान प्रक्षेपण चा प्रयोग फरहान मुजावर, मुस्कान शेख, इकरा पल्ला यांनी यशस्वीरीत्या सादर केला. तर मायशा शेख, सिद्धी चोबे, गीता विजापुरे, सिद्रा कुरेशी या विद्यार्थिनी वेगवेगळ्या शास्त्रज्ञा बद्दल माहिती सांगितली.
या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाच्या शिक्षिका कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाणे, शिला कांबळे, मंगल हिंगनकर, अश्विनी गवारे, देशमुख सुजाता, सोनाली विभुते, धनश्री काळे, दिपाली सुतार आदी शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. ....
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!