ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

प्रतिबंधीत अंमली पदार्थ बाळल्या प्रकरणी परंडा पोलीसांची मोठी कारवाई. .... Paranda police take major action in case of smuggling of prohibited drugs

प्रतिबंधीत अंमली पदार्थ बाळल्या प्रकरणी परंडा पोलीसांची मोठी कारवाई. ....

Paranda police take major action in case of smuggling of prohibited drugs
Paranda police take major action in case of smuggling of prohibited drugs परंडा - दि. १) परंडा पोलीसांकडून धडक कारवाई करत दि. २८ रोजी सायंकाळी ५ वाजनेचे सुमारास परंडा ते मुंगशी जाणाऱ्या रोडवर एका इसमाकडून १४ ग्रॅम ५१० मिली अंमली पदार्थ एम.डीपावडर ज्याची अंदाजे किंमत २ लाख १७ हजार ६५० रू. व जुनी १५ हजार रू. किंमतीची मोटारसायकल असा एकून २ लाख ३२ हजार ६५० रू चा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई करण्यात आली.

         याबाबत पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या पथकाने धडक कारवाई केली. दि. २८ रोजी सायंकाळी ५ वाजनेच सुमारास  परंडा ते मुंगशी जाणारा रोडवर मुंगशी गावाकडुन परंडा शहराकडे येणाऱ्या मोटार सायकल नंबर एम.व्ही.बी. ७१८१ यावरील इसमास मोटार सायकल थांबविण्याचा इशारा केला असता तो मोटार सायकल थांबवत नसल्याचे निर्देशनास येताच त्याची मोटार सायकल आडवुन त्यास मोटार सायकलचे खाली उतरवण्यात आले. त्यास नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी नवनाथ सोनवणे वय ४५ वर्ष, रा. गारभवानी इंदीरा नगर झोपडपट्टी परंडा असे सांगीतले. त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता शर्ट च्या खिशा मध्ये अंमली पदार्थ एम.डीपावडर ज्याची अंदाजे किंमत २ लाख १७ हजार ६५० रू. पॉलिथीनच्या लहान पिशव्यामध्ये मिळुन आली. व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जुनी वापरती किंमत १५ हजार रुपये असा एकून २ लाख ३२ हजार ६५० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो.हे.कॉ. नितीण गुंडाळे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजि.नंबर १०५/२०२६ कलम ८ (क), २१ (ब) गुंगीकारक औषदी द्रव्य व मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरोपीस अटक करून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बी.आर. खरात करीत आहेत.


आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. .... 

रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com

Post a Comment

0 Comments