आसू येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अभियान संपन्न. ... Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj Samadhan Camp Campaign concluded at Aasu.
शिबीरामध्ये सर्वसामान्य नागरीकांना मिळाला लाभ. ...

Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj Samadhan Camp Campaign concluded at Aasu.
परांडा - दि. ७) महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान करण्याच्या उद्देशाने दि. ७ रोजी आसू येथील महालिंगराया मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न झाले. यामध्ये उपविभागीय अधिकारी रेवया डोंगरे, परांडा तहसीलदार निलेश काकडे यांनी शिबिरामध्ये मार्गदर्शन करून महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे यावर मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये शासनाच्या नवीन धोरणाबद्दल महसूल विभागाच्या संबंधित सेवा सर्वसामांन्य नागरीकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावित धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये अकृषी रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्यावतीकरण इत्यादी सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना होण्यासाठी वरील नवीन शासन निर्णयाचे तहसीलदार यांनी सखोल मार्गदर्शन केले.
![]() |
| Chhatrapati Shivaji Maharaj Maharaj Samadhan Camp Campaign concluded at Aasu. |
[ ] शिबिराच्या ठिकाणी या लाभार्थ्यांंना मिळाला लाभ. ...
शिबिरामध्ये २० फेरफार निकाली काढण्यात आले. सातबारा दुरुस्ती संदर्भात १७ अर्ज स्वीकारण्यात आले. शेतकऱ्यांना ५२ सातबारा, १७ (८-अ) डिजिटल उतारे उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये जात प्रमाणपत्र, सात रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर, वैवाहिक, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र वाटप करण्यात आला.
तर फेरफार साठी १५ व सातबारा दुरुस्तीसाठी १७ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत इ-मोजणी, तीन पीएम किसान निरंक व तक्रार निवारण कक्ष आठ तक्रारींचे जागेवरच लोकांना नवीन कायद्या बाबत वर्ग २ चे १ करणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कमी जास्त पत्रक दोन दोन गावांमध्ये फेरफार घेऊन महसूल दप्तरांचे अद्यावतीकरण करण्यात आले. इतर लाभांमध्ये शिधापत्रिका ११, सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी, श्रावण बाळ, लाभार्थींचे मंजुरी आदेशाचे उपविभागीय अधिकारी डोंगरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आयुष्यमान कार्ड २१, रेशन कार्ड दुरुस्ती २२, पानंद व रस्ते प्रकरणात सहा अर्ज नवीन व भारतीय डाक विमा योजना लाभ आठ पोस्टाच्या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ या ठिकाणी पोस्ट विभागामार्फत देण्यात आला.शिबिर सकाळी १० ते ४ वा. पर्यंत या वेळेमध्ये लाभार्थी नागरीकांनी सहभाग नोंदवून शिबीर यशस्वी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी ए.बी. सुरवसे, ग्राम महसूल अधिकारी शिंदे, वाळके, श्रीमती खंबायत, तसेच नायब तहसीलदार बाडकर, नायब तहसीलदार पूजा गोरे, महा-ई-सेवा केंद्र चालक, आसू येथील सरपंच, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!