जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. ...
परंडा - रंगोली न्युज दि. ८)
"ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला",
"ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला",
"ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला".
![]() |
| On the occasion of International Women's Day |
आज ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण फक्त बोलण्यातूनच नाही तर प्रत्यक्षात स्त्रीच्या कर्तुत्वाचा लेखणीतून समाजातून कुठलाही कमीपणा न मानता तिच्या कार्याचा गुण गौरव केला पाहिजे. परंतु आज आपण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये वावरत असताना स्त्रियांना दायित्वाची वागणूक देत असो तर ते चुकीचे ठरणार आहे. आपण विचार करायला पाहिजे स्त्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. जी घरची जबाबदारी संस्कार आणि भावनिक आधार सांभाळून कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेते. ती केवळ घरातील कामेच करत नाही, तर ती आर्थिक व्यवस्थापन मुलाचे संगोपन आणि आनंदी वातावरण टिकून ठेवते. आज आपण जर विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही कोहिनूर हिऱ्यासारखी चमकत आहे. पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन लढत आहे. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपला नावलौकिक वाढवत स्वतःचे, आपल्या परिवाराचे आपल्या राज्याचे पर्यायाने आपल्या देशाचे नाव चहू मूलखात गाजवत आहे. आज स्त्री उत्तम डॉक्टर, उत्तम इंजिनियर, उत्तम शिक्षिका, वकील, पायलट, राष्ट्रपती अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचे सोनेरी पाऊल चमकत आहे.
राज्यातील अनेक महिलांनी आजवर विविध क्षेत्रात देश पातळीवर ठसा उमटवला आहे. भरपूर कर्तृत्ववान महिलांनी विविध क्षेत्रात पाऊल टाकून इतिहास निर्माण केला आहे. यामध्ये काही स्त्रियांची माहिती आपण महिला दिनाच्या निमित्ताने घेणार आहोत.
प्रतिभा पाटील :-
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती (२५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२) प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेऊन नवा इतिहास रचला. त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम करताना महिला सक्षमीकरण, आधुनिक शिक्षण, आणि समावेशक विकास यासारख्या मुद्द्यावर भर दिला.
सावित्रीबाई फुले :-
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका (३ जानेवारी १८३१ ते १० मार्च १८९७) सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात ३जानेवारी १८३१ रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि शिक्षिका म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले. त्या महिलांना शिक्षण देण्यासाठी सुरू झालेल्या चळवळीत अग्रस्थानी राहिल्या आहेत. त्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. अनिष्ट रूढी आणि परंपरामुळे देशातील महिलांची दयनीय स्थिती असताना त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अमूल्य असे योगदान दिलं.
डॉ. आनंदी गोपाळ जोशी: -
देशातील पहिल्या महिला डॉक्टर (३१ मार्च १८६५ ते २६ फेब्रु १८८७) देशातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर आनंदी जोशी यांनी सर्व वयोगटातील महिलांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले .
दुर्गाबाई कामत :-
भारतातील पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री दुर्गाबाई कामत यांचा जन्म १८७९ मध्ये झाला. मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री असलेल्या दुर्गाबाई या देशातील पहिल्या महिला चित्रपट अभिनेत्री झाल्या आहेत. दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासुर चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. अभिनेत्री म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अविस्मरणीय ठरले आहे.
सुचेता कृपलानी :-
(पहिली मुख्यमंत्री)सुचिता कृपलानी या भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 2 ऑक्टोबर 1963 रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
कॉर्नेलिया सोराबजी :-
(पहिली वकील )कॉर्निया सौरभजी या भारतातील पहिल्या महिला वकील होत्या. १५ नोव्हेंबर १८६६ रोजी नाशिक येथे जन्मलेल्या सोराबजी मुंबई विद्यापीठाची पदवी मिळवणाऱ्या पहिल्या महिला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या पहिल्या महिला वकील होत्या.
शीला डावरे:-
(भारतातील पहिली महिला ऑटो ड्रायव्हर ) हातात फक्त बारा रुपये घेऊन १८ वर्षीय शिला डावरे यांनी स्वप्न पूर्ण करण्याकरिता घर सोडले. त्या भारतातील पहिल्या महिला ऑटो रिक्षा चालक बनल्या आहेत.
प्रियांका मोहिते :-
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियांका मोहिते यांनी जगातील १० वे सर्वात उंच शिखर अन्नपूर्णा सर केले आहे. ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक ठरल्या आहेत. २०२० मध्ये तेनझिंग नोर्गे सहा सी पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रियंकाचा जन्म ३० नोव्हेंबर १९९२ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला.
सुरेखा यादव :-
(पहिली महिला रेल्वेचालक) आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यांनी कराड येथील सरकारी पॉलिटेक्निक मधून शिक्षण घेतले. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांची रेल्वेमध्ये मोटार ड्रायव्हर पदासाठी निवड झाली. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. त्यांनी मुंबईतील मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक, लोको पायलट, सहाय्यक चालक आणि चालक अशा विविध पदावर त्यांनी काम केलं आहे. म्हणूनच या आणि अशा अनेक आपल्या भारतीय स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्रातील स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा गुणगौरव वाढवला आहे. म्हणूनच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला म्हणावेसे वाटते. तीच जिजाऊ, तीच सावित्री, तीच आहे अहिल्या.
सहनशीलतेच्या दर्यात प्रेमाची फुलली वेलीया. कधी रुसली, कधी हसली, कधी पेटली ज्वाला. नमन आज करूया, कर्तुत्ववान त्या स्त्रीशक्तीला! घराची उंबरठा ओलांडून, आकाशी तिने झेप घेतली. विज्ञानापासून रक्षणापर्यंत, तीच खरी भाग्यवान ठरली. कष्टातून घडवले विश्व, त्यागाची ती मूर्ती, कधी माऊली, कधी भगिनी तर कधी यशाची मूर्ती. संकटाशी झुंजताना, ती खंबीरपणे उभी राही. अडथळ्यांना लाथाडून नव दिशा ती शोधून पाहि. आत्मसन्मानाची ज्योत, हाती घेऊनी चाले. ती स्त्रीच खरी, संसाराचे सार समजून पाले. कधी घराला सावरते ,कधी कर्तुत्व गाजवते. समाजाच्या अंगणात, यशोगाथा ती रचते. नाही कुणापुढे झुकली, तीच धैर्याची गाथा. स्त्री शक्तीच्या या कर्तुत्वाला, माझा मानाचा मुजरा! माझा मानाचा मुजरा!!
.......लेखन आणि संकलन.

On the occasion of International Women's Day
सचिन देविदास पाटील - संशोधक विद्यार्थी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर,
सहशिक्षक. अंतरगाव हायस्कूल अंतरगाव, ता. भूम. जि. धाराशिव.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!