ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धनंजय सावंत यांचा सहकार्यांसह भाजपा मध्ये पक्षप्रवेश. ... जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी आरंभ नव्या राजकीय अध्यायाचा. ... धनंजय सावंत Dhananjay Sawant joins the BJP along with his associates.

धनंजय सावंत यांचा सहकार्यांसह भाजपा मध्ये पक्षप्रवेश. ...

जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी आरंभ नव्या राजकीय अध्यायाचा. ... धनंजय सावंत 

Dhananjay Sawant joins the BJP along with his associates.

Dhananjay Sawant joins the BJP along with his associates.
Dhananjay Sawant joins the BJP along with his associates.

परंडा - रंगोली न्युज दि. १९) धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी शिवसेना (शिंदे गट) ला धक्क देऊन भाजपा प्रदेशध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते धनंजय सावंत कुटूंबासह त्यांचे सहकारी समर्थकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

   याप्रसंगी जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजापा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते मल्हार पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अनिल काळे आदींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला.

      दि. १८ रोजी भाजपा मध्ये झालेल्या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना जिल्हा समन्वयक प्रा. गौतम लटके, जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती दत्तात्रय मोहीते, संजय सावंत, सेहम सावंत, अजिंक्य सावंत, सौ ज्योती धनंजय सावंत, कु. सखी धनंजय सावंत, गौतम लटके, दत्तात्रय मोहिते, युव सेना ता.अध्यक्ष भूम निलेश चव्हाण, परंडा तालुका संघटक जयदेव गोफणे, धनंजय पाटील, विजय नवले, शशिकांत खुणे, बालाजी कातुरे, श्रावण गणगे, भागवत डाकवाले आदी कार्यकर्त्यांसह माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष तथा जि.प सदस्य धनंजय सावंत यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश संपन्न झाला.

[ ] माझा लढा हा कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी. ...  माझा हा लढा कार्यकर्त्यांसाठी होता, आणि कार्यकर्त्यांच्या पक्षात मी आलो आहे. मला माझ्या सहकाऱ्यांसह माझ्या मतदारसंघातील नागरीकांना, शेतकऱ्यांना न्याय देता येईल म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. आमदार तानाजी सावंत हे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे मोठे प्रस्थही आहे. पण..... ही सगळी ताकद मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची होती. तो कार्यकर्ता कुठेतरी दुखावला होता. म्हणून या सर्व घटना घडलेल्या आहेत. ... धनंजय सावंत



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments