ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रविंद्र बारसकर यांना आदर्श इंग्लिश शिक्षक पुरस्कार. ... Ravindra Baraskar receives the 'Ideal English Teacher' Award.

 रविंद्र बारसकर यांना आदर्श इंग्लिश शिक्षक पुरस्कार. ...

Ravindra Baraskar receives the 'Ideal English Teacher' Award.

Ravindra Baraskar receives the 'Ideal English Teacher' Award.
Ravindra Baraskar receives the 'Ideal English Teacher' Award.

परंडा - रंगोली न्युज दि. १७) सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने "आदर्श इंग्लिश शिक्षक" म्हणून दिला जाणारा पुरस्कार दि. १७ रोजी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट चे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते रविंद्र बारसकर यांना देण्यात आला.

Ravindra Baraskar receives the 'Ideal English Teacher' Award.
       सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातुन एक आदर्श इंग्लिश शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यामध्ये रविंद्र कानिफनाथ बरसकर यांची निवड करण्यात आली. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट चे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने रविंद्र बारसकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी यश कल्याण सेवाभावी संस्था करमाळा चे डॉ. गणेश करे पाटील. व डॉक्टर प्रचिती पुडे उपस्थित होते. 

 

Ravindra Baraskar receives the 'Ideal English Teacher' Award.
     रविंद्र बारसकर हे परंडा तालुक्याचे भुमीपुत्र असुन ते सध्या प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे, ता. माढा, जि. सोलापूर येथे माध्यमिक विद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचे स. शि. म्हणुन कार्यरत आहेत. परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे ते विद्यार्थी. त्यांना विषय ज्ञानासह खो-खो, कबड्डी खेळाची आवड. ते राज्यस्तरीय खेळाडू आहेत. शालेय जिवनात त्यांच्या शाळेच्या कबड्डी संघने राज्य स्तरापर्यंत मजल मारली आहे.  

      माढा तालुक्यातून चालू वर्ष सन २०२५-२६ चा पुरस्कार प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे, ता. माढा जि. सोलापूर चे उपक्रमशील शिक्षक रविंद्र कानिफनाथ बारसकर या दांपत्यानी हा पुरस्कार स्विकारला. रविंद्र बारसकर यांना आदर्श इंग्रजी शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सोलापूर जिंल्ह्यासह परंडा तालुक्यातील शिक्षण क्षेत्र, मित्र परिवारांकडून रविंद्र बारसकर यांच कौतुक होत आहे.





आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments