खैरी नदी प्रवाहात पाणी सोडण्याची मागणी. ...
Demand to release water into the Khairi River channel.
![]() |
| Demand to release water into the Khairi River channel. |
परंडा - रंगोली न्युज दि. १७) पांढरेवाडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या परंडा तालुक्यातील जगदाळवाडी, देऊळगाव व पांढरेवाडी येथील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व शेती उपयोगासाठी खैरी (पांढरेवाडी) प्रकल्पातुन तात्काळ खैरी नदी प्रवाहामध्ये पाणी सोडण्याची मागणी जिल्हापरिषद सदस्य भाऊसाहेब खरसडे यांनी दि. १७ रोजी परंडा तहसिलदार यांच्या मार्फत धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सध्या उष्णतेमध्ये वाढ होऊ लागली आहे. जगदाळवाडी, देऊळगाव व पांढरेवाडी या गावांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. या परिसरामध्ये नागरीकांना पिण्यासाठी व शेती उपयोगासाठी सध्या गरज निर्माण झालेली आहे. शेतामधील उभी पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खैरी (पांढरेवाडी) प्रकल्पांतर्गत असणाऱ्या वरील गावांना दरवर्षी या प्रकल्पातुन खैरी नदी प्रवाहामध्ये पाणी सोडण्यात येते. त्याप्रमाणे तात्काळ पांढरेवाडी, देऊळगाव व जगदाळवाडी या गावांना उपयोगी येणाऱ्या खैरी नदी प्रवाहामध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाऊसाहेब खरसडे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!