ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे मंथन व इंडियन टॅलेंट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. Honoring of meritorious students from the Manthan and Indian Talent examinations at Sant Mira Public School, Paranda.

संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे मंथन व इंडियन टॅलेंट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

Honoring of meritorious students from the Manthan and Indian Talent examinations at Sant Mira Public School, Paranda.
Honoring of meritorious students from the Manthan and Indian Talent examinations at Sant Mira Public School, Paranda.

रंगोली न्युज - परंडा दि. १७) 
Honoring of meritorious students from the Manthan and Indian Talent examinations at Sant Mira Public School, Paranda. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल  येथे मंथन जनरल नॉलेज व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उल्लेखनीय यश "Remarkable Success in the Indian Talent Olympiad Examination" संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

        यामध्ये ईश्वरी विष्णू साबळे (इ. १ ली) हिने मंथन जनरल नॉलेज परीक्षेत केंद्रात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक  पटकवला. श्रेयस चंद्रकांत सूर्यवंशी (इ ४ थी) याने केंद्रात द्वितीय क्रमांक पटकवला. शौर्य समाधान खुळे, जयेश मयुरकुमार बेदमुथा, राहुल धनंजय गेळे, भक्ती आनंद खराडे, सलोनी श्याम जाधव व फातिमा सलीम हन्नूरे यांनी मंथन परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले. तसेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या परीक्षेत आरुषी दैवान पाटील हिचा राज्यात ८ वा, तर सिद्धी हरिदास भिलारे हिने राज्यात १५ वा क्रमांक पटकवला तर दिव्या प्रदीप जाधव, श्रेयश चंद्रकांत सूर्यवंशी, अर्शीया जब्बार तांबोळी व जयेश मयुरकुमार बेदमूथा यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संतोष भांडवलकर व सर्व शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. 

     या विद्यार्थ्यांना सुमय्या शेख, प्रीती देशपांडे,माधुरी नांगरे, राणी भिलारे, करिष्मा तुटके, पूनम कांबळे, समाधान शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे यश मिळविल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व बौद्धिक विकासास चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच परीक्षांमध्ये यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने केले जात असल्याचे सांगण्यात आले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!




Post a Comment

0 Comments