मा. धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरमध्ये १५८ रक्तदात्यांचे रक्तदान.
सामाजिक बांधिलकीतुन जि.प. सदस्य धनंजय सावंत यांचा वाढदिवस.
![]() |
| 158 blood donors donated blood at a blood donation camp organized on the occasion of Hon. Dhananjay Sawant's birthday. |
रंगोली न्युज - परंडा दि.१४)
158 blood donors donated blood at a blood donation camp organized on the occasion of Hon. Dhananjay Sawant's birthday. धाराशिव जिल्हा परिषद सदस्य तथा श्री काळभैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय सावंत यांच्या १६ एप्रिल रोजीच्या वाढदिवसा निमीत्ताने श्री काळभैरवनाथाच्या सोनारी नगरीमध्ये दि. १३ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरामध्ये तब्बल १५८ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. धाराशिव जिल्हा परिषद. सदस्य धनंजय सावंत यांचा वाढदिवस दि. १६ एप्रिल रोजी आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी दि. १३ एप्रिल रोजी सोनारी येथे या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सण-उत्सवाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, या उदात्त हेतूने हे शिबिर घेण्यात आले.शिबिरासाठी श्री भगवंत ब्लड सेंटर, बार्शी "Shri Bhagwant Blood Center, Barshi" यांच्या टीमने तांत्रिक सहकार्य पुरवले. सकाळपासूनच तरुणाईसह ग्रामस्थांनी रक्तदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. १५८ बॅग रक्त संकलित करून तरुणांनी आपल्या नेत्याला अनोखी 'वाढदिवस भेट' दिली आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा नेते रवि मांडवे, भास्कर ईटकर, दिपक पाटील, अविनाश हांगे, दिगंबर ईटकर, अविनाश नलवडे, परमेश्वर पवार, आबासाहेब हांगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याच्या या निर्णयाचे परंडा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!