तहसिलच्या आवारात गाडी अडवून तहसिलदार यांना आरेरावी.
आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाईची मागणी.
सामुहिक बेमुदत रजेवर जाण्याचा महसूल कर्मचारी यांचा इशारा.
रंगोली न्युज - परंडा दि. १७)

Vehicle stopped within the Tehsil premises; Tehsildar subjected to insolent behavior.
Vehicle stopped within the Tehsil premises; Tehsildar subjected to insolent behavior. धाराशिव जिलह्यातील परंडा येथील तहसिलदार निलेश काकडे यांची तहसिल कार्यालयाच्या आवारात गाडी आडवून आरडा-ओरडा, शिवीगाळ केल्या प्रकरणी महसूल कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केले असून आरोपीवर कडक कारवाई न झाल्यास दि. २० एपिल पासून सामुहिक बेमुदत रजेवर जाण्याचा महसुल कर्मचारी यांचा इशारा.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, प्राप्त गुप्त माहीतीच्या दि. १५ रोजी सायंकाळी ६:३५ वाजता परंडा तहसिलदार निलेश काकडे हे अवैध वाळू उत्खनन बाबत कारवाई करण्यासाठी जात असताना योगेश मेटकरी व इतर इसम यांनी तहसील कार्यालय परंडा च्या आवारात येऊन तहसीलदार यांची गाडी अडवून आरडा ओरडा, शिवीगाळ करत दहशत निर्माण करून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यांना तहसिलदार यांनी समजाविण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी हुज्जत घलत अंगावर धावत येत होता. या घटनेच्या गुन्ह्याची नोंद पोलीस ठाणे परंडा येथे रात्री करण्यात आली आहे.
परंडा तहसील कर्मचारी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी, धाराशिव पोलीस अधीक्षक यांना दि. १६ रोजी निवेदन दिले आहे. त्यामध्ये आरोपीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. दि. १६ व १७ रोजी कामबंद आंदोलन केले असून आरोपींवर कारवाई न केल्यास महसुल कर्मचारी हे सोमवार दि. २० एप्रिल रोजीपासून बेमुदत सामुहिक रजेवर जणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!