ग्लोबलच्या विद्यार्थ्यांचे ओलंपियाड स्पर्धेत उल्लेखनीय यश. ...

Remarkable Success for Global Students in the Olympiad Competition.
Remarkable Success for Global Students in the Olympiad Competition. परंडा - रंगोली न्युज दि. २८) परंडा तालुक्यातील ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ओलंपियाड "Olympiad" स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा गौरव वाढविला आहे. विविध विषयांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदके पटकावली. या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर आणि सचिव आशाताई मोरजकर यांच्या हस्ते विशेष सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. परंडा तालुक्यातील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिटयूट मधून ३४ विद्यार्थी ओलंपियाड परीक्षेस बसले होते. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल ऑफ डिसटिंक्शन व प्रशस्तीपत्र, १५ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल ऑफ एक्सेलन्स व प्रशस्तीपत्र, ८ विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे मत व्यक्त केले की, ओलंपियाड ही केवळ एक स्पर्धा नसून ती विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, कष्ट आणि चिकाटीची खरी कसोटी आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करून संस्थेचा स्वामिमान वाढवला. कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्षांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे संपूर्ण संस्थेचा अभिमान आहे. मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर विद्यार्थी कोणतीही उंची गाठू शकतात.” तसेच अध्यक्ष व सचिव यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अधिकाधिक यश मिळवण्याचे आवाहन केले. या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द हे महत्त्वाचे घटक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!