अनाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान संपन्न. ...
शिबीरामध्ये सुमारे ३५० नागरीकांना मिळाला लाभ. ...
![]() |
| Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Camp Campaign Concluded at Anala. |
शिबिरामध्ये सहभागी नागरीक यांना परांडा तहसीलदार निलेश काकडे यांनी मार्गदर्शन करून महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य दत्तात्रय पाटील, अनाळा येथील सरपंच अंबिका क्षिरसागर यंच्यासह अनाळा महसूल मंडळातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये शासनाच्या नवीन धोरणाबद्दल महसूल विभागाच्या संबंधित सेवा सर्वसामांन्य नागरीकांपर्यंत पोहचाव्यात हा या शिबीराचा उद्देश समोर ठेऊन आयोजित शिबीरामध्ये प्रत्यक्ष सुमारे ३५० लाभधारकांना लाभ मिळाला आहे. त्यामध्ये शैक्षणिक व महसुली प्रमानपत्र ७८, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या अर्जांची संख्या ३५, तसेच इतर महसुली लाभामध्ये शिधापत्रिका, संगायो/इंगायो/ श्रावणबाळ योजना, नैसर्गिक आपत्ती अनुदान तपासणी व इतर लाभाची संख्या १९९, तसेच निकाली काढण्यात आलेल्या फेरफार ची संख्या ७, ७/१२ दुरूस्ती १०, डिजीटल ७/१२ वितरण ७७, ८-अ ची संख्या ५६ चे वितरण करण्यात आले.
बळीराजा पाणंद रस्ते :-
शिबीरामध्ये महसूल मंडळ अनाळा अंतर्गत बळीराजा पाणंद रस्त्याची Baliraja Farm Access Roads माहिती संकलित करण्यात आली. त्याकरिता उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग परंडा तसेच गट विकास अधिकारी पं.स. परंडा यांना तपासणी करिता पाठविण्यात आले.
अनाळा येथील दि. २८ रोजी आयोजित शिबीरामध्ये सुमारे ३५० लाभार्थी नागरीकांनी सहभाग नोंदवून शिबीर यशस्वी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार मिलींद परळे, मंडळ अधिकारी वाय. एस. जगताप, ग्राम महसूल अधिकारी, तसेच इतर महसुल कर्मचारी व अनाळा येथील सरपंच, ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!