अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावर सोशल मीडिया, मोबाईलचा परिणाम?
पालक व पाल्य यांनी मोबाईल, सोशल मीडिया वापरावर मर्यादा ठेवण्याची गरज!
![]() |
| प्रातिनिधिक चित्र (AI Generated) |
👉सोशल मीडियाचा प्रभाव:-
यंत्र युगामध्ये तंत्रज्ञानाची गरज ही आवश्यक आहेच. वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, कॅम्पुटर याचा वापर असणे देखील गरजेचे आहे. परंतु त्याचा इतका प्रभाव पडलेला दिसून येत आहे की, त्यावर मर्यादा ठेवण्यास तरूण मुले व पालक कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत आहे. ती मर्यादा देखील असणे तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु यामध्ये सोशल मीडियाचा तरुणांवर इतका प्रभाव पडलेला दिसून येत आहे की, काही तरुण मुले, मुली मोबाईल, कॅम्पुटर च्या वापराच्या मर्यादा विसरल्यासारखे दिसुन येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुण पिढी दिवसातील बहुतांश वेळ मोबाईल मध्ये डोके घालून बसल्याचेच दिसत आहे. यामुळे त्यांच्या भविष्यावर देखील त्याचा परिणाम होणार नाही का? आजच्या तरुण युवक युवतींना मैदानी खेळ, बुद्धिबळाचे खेळ असे विविध परंपरागत खेळ आता लोप पावले जात असल्याचे दिसत आहे. प्रत्येक जण लहान थोर चार भिंतीच्या आत फक्त टीव्ही. मोबाईल, कॉम्पुटर समोर बसल्याचे दिसत आहे.
👉सोशल मीडियाचा वापर :-
यांत्रिकीकरणाच्या युगात माहिती तंत्रज्ञानाची नक्कीच आवश्यकता आहे. त्यासाठी इंटरनेट कॅम्पुटर मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाचा Social media सर्रास वापर होतो. परंतु त्या वापराची आवश्यकता व अनावश्यकता याचा समतोल राखणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कुठे कधी कसा व किती करावा याला मर्यादा देखील ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. आपण याचा वापर कशासाठी करतो? व त्यापासून आपला फायदा किती व तोटा किती होतो? हे प्रथम समजून घेण्याची प्रत्तेकाची अत्यंत गरज आहे. मोबाईल सारख्या तंत्राचा वापर मर्यादे पुरता नाही केला तर त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच दिसून येत आहेत. अतिवापरामुळे शारीरिक दुखणे देखील वाढत आहे. तर काहींना दृष्टीदोष निर्माण होत आहेत. काहींना तर मोबाईलचे व्यसन लागल्यासारखे सतत मोबाईल मध्ये मुले गुंतून राहतात. त्यामुळे अनेक पालकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत देखील आहेत.
पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्याला मोबाईल वापरण्यासाठी ची मुभा कधी द्यावी हे समजणे महत्वाचे आहे. मेबाईलची आपल्या अल्पवयीन पाल्याला गरज आहे का? मोबाईल वापराताना त्याचा तो कसा, किती व कशासाठी वापर करतो यावर अप्रत्यक्ष लक्ष ठेवणे “पालकांची जबाबदारी” 'Parents' Responsibility' नाही का?
👉अल्पवयीन मुलांवर सोशल मीडियाचे होणारे परिणाम :-
![]() |
| प्रातिनिधिक चित्र (AI Generated) |
👉मोबाईल वापरावर मर्यादा:-
मागील जवळपास दहा वर्षांमध्ये मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यासारख्या तंत्रज्ञानाचा समाज माध्यमावर मोठा प्रभाव निर्माण झाला असल्याचे दिसत आहे. याचा आवश्यकतेपेक्षा अनावश्यक वापर इतका वाढला आहे की, आजच्या तरुणांना आपल्या दिवसातला वेळ कुठे, कधी व कसा गेला हेच समजेणासे झाले आहे. त्याची कसलीही मर्यादा उरलेली शिल्लक दिसत नाही. आज कुठेही पहाल तिथे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईलचा वापर आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे आपण कोणत्या कामासाठी किती वेळ द्यायचा? कोणत्या कामासाठी वेळ द्यायचा? याची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मीडिया, मोबाईल वापरावर तरुणांसह सर्वांनीच स्वतःहून कुठेतरी मर्यादा घालून घेणे गरजेचे आहे.
👉मोबाईल सोशल मीडियाची आवश्यकता : -
हो! आजच्या हाय स्पीडच्या युगामध्ये तितकीच मोबाईल, सोशल मीडिया, माहिती व तंत्रज्ञानाची आवश्यकता व गरज देखील आहे. आज पावलोपावली नवनवीन माहिती मिळविण्यासाठी, कार्यालयीन कामासाठी, शैक्षणिक कामासाठी, व्यावसायिक कामासाठी इत्यादी कुठे पाहल तिथे मोबाईल व सोशल मीडियाची तेवढीच आवश्यकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही दुष्परिणाम जरी असले तरी त्याचे फायदे देखील तेवढ्याच प्रमाणात होताना दिसत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

.jpeg)
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!