ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जवाहर नवोदय व सैनिक स्कुल प्रेवेशपत्र विद्यार्थांचा सत्कार. ... बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. ... Child Development Project Officer Ganesh Kukade guides students.

जवाहर नवोदय व सैनिक स्कुल प्रेवेशपत्र विद्यार्थांचा सत्कार. ...

बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. ...

Child Development Project Officer Ganesh Kukade guides students.

Child Development Project Officer Ganesh Kukade guides students.
Child Development Project Officer Ganesh Kukade guides students.

परंडा - रंगोली न्युज दि. २१) परंडा येथील राज कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल प्रवेश यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. 

     यामध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शौर्य रेश्मा समाधान खुळे या विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी निवड झाली असून अथर्व रूपाली महेश नलवडे या विद्यार्थ्याची सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये निवड झाली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले अशा विद्यार्थ्यांचा राज कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रणिती अमोल सोनवणे ९१.२५ टक्के, शौर्य समाधान खुळे ९० टक्के, अथर्व महेश नलवडे ९० टक्के, भार्गवी महेश शिंदे ८६.२५ टक्के, आयुष विजयकुमार माळी ८५ टक्के, श्रेया किशोर जाधव ८५ टक्के, राजवर्धन गणेश कुकडे ८३.७५ टक्के, रणजित प्रकाश सोनवणे ८३.७५ टक्के, अभिराज दिलीप चौधरी ८३.७५ टक्के व आराध्या ज्योतिराम मिस्कीन ८० टक्के आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

      यावेळी अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मार्गदर्शन करत असताना स्पर्धा परीक्षेचा केंद्रबिंदू व मानबिंदू राज कोचिंग क्लासेस आहे असं त्यांनी नमूद केलं. गणेश कुकडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या समारंभातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन नेत्र दीपक कामगिरी करावी असे सांगितले. तसेच पालकांच्या वतीने राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पालक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे, समाधान खुळे, रेश्मा खुळे, सदानंद देशमुख, महादेव गिरी, नीलम गिरी, महेश नलवडे, रूपाली नलवडे, जिल्हा परिषद शिक्षक महेश शिंदे, अमोल भोजने, कृष्णा देशमुख, सुजित देशमुख व सर्व गुणवंत विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे, समाधान खुळे, सदानंद देशमुख या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित देशमुख यांचे बंधू जिल्हा परिषद शिक्षक सदानंद देशमुख यांनी मानले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments