ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अवैध दारू वाहतुकी विरोधात परंडा पोलीसांची मोठी कारवाई. ... अवैध दारू व इनोव्हा कार सह एकूण १६ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, तिघांना जेरबंद. ... Paranda Police Launch Major Operation Against Illegal Liquor Transport.

अवैध दारू वाहतुकी विरोधात परंडा पोलीसांची मोठी कारवाई. ... 

अवैध दारू व इनोव्हा कार सह एकूण १६ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त, तिघांना जेरबंद. ...

Paranda Police Launch Major Operation Against Illegal Liquor Transport.

Paranda Police Launch Major Operation Against Illegal Liquor Transport. Paranda Police Launch Major Operation Against Illegal Liquor Transport.

Paranda Police Launch Major Operation Against Illegal Liquor Transport.

परंडा - रंगोली न्युज दि. २१)  परंडा पोलिसांनी अवैध दारू वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत एका इनोव्हा कारसह एकूण १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईत गोवा आणि कर्नाटक राज्यातील तीन आरोपींना दि २० रोजी अटक करण्यात आली आहे. 

         परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुर्डुवाडी ते परंडा मार्गावर आवारपिंपरी शिवारात सटवाई देवी मंदीरा जवळ एका इनोव्हा कारमधून अवैध देशी-विदेशी दारूची चोरटी वाहतूक करून विक्री करत असताना जात होती. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. सदरील

कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, पो.हे.कॉ. शिवाजी राऊत, नितीन गुंडाळे, साधु शेवाळे, विशाल सगर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. याप्रकरणी पोलीस अंमलदार विशाल सगर यांच्या फिर्यादी वरून परंडा पोलीसात तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी राऊत करत आहेत.

आवारपिंपरी शिवारात सटवाई मंदिराजवळ सिनेमॅटिक कारवाई...

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने परंडा ते कुर्डुवाडी रोडवरील सटवाई देवी मंदिराजवळ आवारपिंपरी शिवारात दुपारी १२ वा. १० मी. चे सुमारास पाळत ठेवली. काही वेळातच कुर्डुवाडीकडून एक गजगा रंगाची इनोव्हा कार क्रमांक जी.ए.०३ डब्लू ०२३३ येताना दिसली. पोलिसांनी इशारा करून गाडी थांबवली व झडती घेतली असता, गाडीत खाकी रंगाचे ५० बॉक्स आढळून आले. विचारपूस केली असता चालकाने ही दारू गोव्यातील असल्याचे व ती विक्रीसाठी नेत असल्याचे कबूल केले.

१६ लाख २० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त. ...

विदेशी दारू रॉयल इम्पक्ट  कंपनीच्या ७५० मिलीच्या एकूण ६०० बाटल्या किंमत १ लाख विस हजार व १५ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार. एकूण मुद्देमाल १६ लाख २० हजार रुपये च्या मुद्देमालासह आलताफ मौलासाब रामापूर (वय २९, रा. कांडोलिम, गोवा), अमोल आराख वय ३२,रा. बुलढाणा सध्या मुक्काम गोवा, महेश हनुमंतआप्पा अभिगेरी वय ३०, रा.हवेरी, कर्नाटक या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments