ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धनंजय सावंत नेतृत्वाखाली भाजपा पक्ष प्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार. ... धाराशिव जिल्ह्यात भाजपा ची पकड वाढली! Felicitation of activists who joined the BJP under the leadership of Dhananjay Sawant.

धनंजय सावंत नेतृत्वाखाली भाजपा पक्ष प्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार. ...

धाराशिव जिल्ह्यात भाजपा ची पकड वाढली!

Felicitation of activists who joined the BJP under the leadership of Dhananjay Sawant.
Felicitation of activists who joined the BJP under the leadership of Dhananjay Sawant.

परंडा - रंगेली न्युज दि. २०) धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पंचायत समिती,  जिल्हा परिषद निवडणुकीपासून मोठ्या घडामोडी होत आहेत. शिवसेनेतुन माजी जि.प उपाध्यक्ष तथा विद्यमान जि.प. सदस्य धनंजय सावंत यांच्या सहकारी कार्यकर्त्यांची मोठी फळी भाजपा मध्ये गेली आहे. यामुळे भाजपा ला मोठी बळकटी मिळाली असल्याची चर्चा असून धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपाची पकड मोठी होत असल्याची चर्चा सुरू आहे. 

Felicitation of activists who joined the BJP under the leadership of Dhananjay Sawant.
     भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर आणि वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवून धनंजय सावंत यांचे कित्येक सहकारी कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्ष प्रवेशानंतर भाजप नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत परंडा येथे दि. १९ रोजी कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

पक्षप्रवेश -

धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली दि. १८ रोजी मुंबई येथे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंडा येथे सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते धनंजय सावंत यांच्यासह जयदेव गोफणे, महादेव वळेकर, योगेश राऊत, नानासाहेब कातुरे, अशोक राऊत, बंडु अप्पा बानगुडे, बालाजी जगताप, महेश अंधारे, सुधीर रोडगे, सुधीर लटके, विष्णू पवार, राजेंद्र कुदळे, ज्ञानेश्वर अंधारे, अभिजीत गवारे, पै. राहुल वाघमारे, भारत बानगुडे, दिनेश पाटील, कुमार गटकुळ, विशाल शिंगटे आणि प्रशांत खरसडे यांचा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण. ...

       यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, विकास कुलकर्णी, ॲड. जहीर चौधरी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, सोशल मीडिया संयोजक तुषार नेटके, उद्योजक आघाडी संयोजक नागेश गर्जे, अनिल पाटील, सारंग घोगरे, श्रीमंत शेळके, साहेबराव पाडुळे, बाबासाहेब जाधव, विलास खोसरे, निशिकांत क्षिरसागर, रविकुमार गरड, रामदास गुडे, प्रमोद लिमकर, सागर पाटील, योगेश डांगे, बाळासाहेब गिरी, धनंजय काळे, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, पांडुरंग मुसळे आदी उपस्थित होते.

[ ] पक्षाची ताकद वाढेल - 

"पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि विकासाच्या राजकारणाला गती देण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरेल," असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची पकड अधिक घट्ट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरल्याचे दिसत आहे.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments