'भगवा ध्वज' शोभायात्रेत अवघे परंडा शहर झाले राममय! 'जय श्री राम' च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण.
परंडा शहरासह तालुक्यात विविध ठिकानी श्रीराम नवमी उत्साहात.
![]() |
| The entire city of Paranda was immersed in the spirit of Lord Rama during the 'Saffron Flag' procession! |
The entire city of Paranda was immersed in the spirit of Lord Rama during the 'Saffron Flag' procession! परंडा - रंगोली न्युज दि. २६) परंडा तालुक्यासह शहरामध्ये त्रेतायुगातीला भगवान श्री विष्णु यांचा सातवा अवतार मानले जाणारे व सत्य, धर्म, मर्यादा, त्याग आणि करूणा यांचे प्रतीक प्रभू श्रीराम यांचा दि. २६ रोजी (जन्म दिवस) श्री राम नवमी मोठ्या भक्तीमय उत्साहात साजरी करण्यात आली.
परंडा शहरात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य 'भगवा ध्वज' शोभायात्रेने भक्ती आणि उत्साहाचे अभूतपूर्व वातावरण पाहायला मिळाले. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीचे पूजन करून भगवा ध्वज फडकवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. निघालेल्या या यात्रेने श्रीरामनवमीच्या निमीत्ताने रामभक्तांनी शहराला भगवेमय करून सोडले.
प्रमुख उपस्थित यांच्या हस्ते सकाळी ११.१५ वाजता शोभायात्रेचा शानदार शुभारंभ महाराणा प्रतापसिंह चौक येथून या भव्य यात्रेला सुरुवात करण्यात आली. धाराशिव जिल्ह्याचे भाजपा युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीचे पूजन करून भगवा ध्वज फडकवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या रामभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. संपूर्ण मार्गावर 'जय श्री राम' च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.आकर्षक वेशभूषा आणि रामभक्तांचा जनसागर :-
या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची वेशभूषा केलेले लहान चिमुकले होते. हातात भगवे ध्वज घेऊन शेकडोच्या संख्येने रामभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. महिलांची मोठी उपस्थिती आणि ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी यामुळे यात्रेची भव्यता अधिकच उठून दिसत होती.
परंडा शहरातील श्री लाल मारूती मंदिरामध्ये महाआरती:-
![]() |
| The entire city of Paranda was immersed in the spirit of Lord Rama during the 'Saffron Flag' procession! |
शोभायात्रा श्रीराम मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर, ऐतिहासिक श्री लाल मारूती मंदिरामध्ये माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय सावंत, सौ. शैलाताई सुजितसिंह ठाकूर, सौ. ज्योतीताई धनंजय सावंत यांच्या हस्ते भक्तिभावाने आरती करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती :-
श्रीरामनवमी निमीत्त भगता ध्वज शोभायात्रा सोहळ्यात तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, ॲड. संतोष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, प्रा. गौतम लटके, जयदेव गोफणे, विकास कुलकर्णी, तुषार नेटके, उमाकांत गोरे, ज्योती भातलवंडे, गायत्री तिवारी व इतर पदाधिकारी आणि हजारो रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
.jpeg)


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!