ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व सेवा सहयोग फाउंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम. A laudable initiative by The Clearing Corporation of India Limited and Seva Sahayog Foundation.

दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व सेवा सहयोग फाउंडेशन यांचा स्तुत्य उपक्रम. 

परंडा तालुक्यात १५० विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप.

A laudable initiative by The Clearing Corporation of India Limited and Seva Sahayog Foundation.

A laudable initiative by The Clearing Corporation of India Limited and Seva Sahayog Foundation.
A laudable initiative by The Clearing Corporation of India Limited and Seva Sahayog Foundation.

परंडा - रंगोली न्यूज दि. २५) दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत तसेच सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ मार्च रोजी परंडा येथील साळुंके मंगल कार्यालय येथे तालुक्यातील ३६ शाळांतील १५० गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती:-

     कार्यक्रमास परंडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सूर्यभान हाके, सेवा सहयोग फाउंडेशनचे सोशल मीडिया प्रमुख अनिकेत गमरे, धाराशिव जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परंडा तालुकाध्यक्ष ॲड. अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल काशिद, तसेच फाउंडेशनचे प्रतिनिधी श्रीराम केसकर आदी उपस्थित होते.

      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत, दुरच्या वस्तीवरून शाळेत पायी ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींचा सायकलीमुळे वेळ वाचणार आहे . या वेळेचा उपयोग विद्यार्थिनींनी अभ्यासासाठी व आपल्या गुणवत्तावाढीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

     गट शिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व शाळांच्या सुविधा सुधारण्यासाठी पुढील उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सायकली मिळाल्याने विद्यार्थिनी व पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला. मागील वर्षीही या संस्थांच्या माध्यमातून परंडा तालुक्यात १५० सायकलींचे वाटप करण्यात आले होते. या वर्षी भूम तालुक्यात १२५, कळंब येथे १२५ व परंडा तालुक्यात १५० अशा ४०० सायकलींचे वाटप करण्यात आले असून, मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक शंकर पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळसाहेब घोगरे यांनी मानले.

उद्देश:-

      "दि क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ  इंडिया लिमिटेड व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून आजपर्यंत भूम परांडा वाशी या तालुक्यात ५५० सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील वाड्या वस्तीतून येणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून दरवर्षी उपक्रम राबविला जातो. " ..... अनिकेत गमरे - सोशल मीडिया प्रमुख सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments