जिजाऊ ब्रिगेडचे ३ एप्रिल रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन.
Jijau Brigade's State-Level Grand Convention in Mumbai on April 3rd.
![]() |
| Jijau Brigade's State-Level Grand Convention in Mumbai on April 3rd. |
अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून जवळपास एक हजार महिला पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या अधिवेशनातील वैचारिक प्रबोधनाचा व सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील, जिल्ह्यातील तसेच शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे आव्हान जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके, प्रदेश सहसचिव शिवमती आशाताई मोरजकर यांच्या सह जिल्हाध्यक्ष शिवमती रेखाताई पवार यांनी केले आहे.
महाअधिवेशन स्वरूप : -
महाअधिवेशन एकूण चार सत्रामध्ये पार पडणार असून दि. ३ रोजी सकाळी ८:३० ते १०:०० वा. अभिवादनपर सांस्कृतीक कार्यक्रम. प्रथम सत्रामध्ये सकाळी १०:३० ते १२ वा. यामध्ये उद्घाटन समारंभ. दुपारी १२:०० ते १:३० वा आर्थिक साक्षरता या विषयावर शिवमती विनया चौगुले (CA) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच अराजकतेच्या काळात जिजाऊ ब्रिगेडची भूमिका या विषयावर यवतमाळचे व्याख्याते व विचारवंत शिवश्री प्रिवण देशमुख यांचे मार्गदर्शन. दुपारी २:३० ते ४:०० वा. विविध क्षेत्रातील महिलांना संधी या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन. तर दुपारी ४:०० ते ५:३० या वेळेमध्ये समारोप कार्यक्रम संपन्न होईल.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर शिवमती रितूताई तावडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके असणार आहेत.
कार्यक्रम स्थळी विविध सुप्रसिद्ध वक्ते यांचे मार्गदर्शन लाभणार असून अधिवेशनस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. या अधिवेशनासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड पुरुषोत्तम खेडेकर, शिवधर्म संसद सदस्य शिवमती रेखाताई खेडेकर तसेच मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राज्य कार्याध्यक्ष शिवश्री नवनाथ घाडगे, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, जिजाऊ ब्रिगेड महासचिव स्नेहाताई खेडेकर, आंतरराष्ट्रीय अध्यक्षा मयुराताई देशमुख, राष्ट्रीय अध्यक्ष निर्मलाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष अंजलीताई भोसले, मुंबई अध्यक्ष स्मिता देसाई, नवी मुंबई अध्यक्ष भारतीताई पाटील, महासचिव सरिताताई सोमवंशी, कार्याध्यक्ष मनीषाताई देसाई, ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिताताई पाटील व मुंबईची सर्व टिम अथक परिश्रम घेत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!