आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमीत भव्य कुस्ती स्पर्धा.
परंडा येथे रंगणार लाल मातीतिल कुस्त्याचा फड.
कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी.
कुस्ती स्पर्धेमुळे तरूण, कुस्तीगीर यांना प्रोत्साहन - आयोजक - राहूल डोके
Grand Wrestling Tournament on the Occasion of MLA Prof. Dr. Tanaji Sawant's Birthday.
![]() |
| Grand Wrestling Tournament on the Occasion of MLA Prof. Dr. Tanaji Sawant's Birthday. |
परंडा - रंगोली न्युज दि. २५) माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे युवासेना प्रमुख तथा कृषी उत्पंन्न बाजार समिती संचालक राहुल डोके यांच्या वतीने दि. २८ मार्च रोजी परंडा शहरातील पंचायत समिती मैदान येथे भव्य जंगी कुस्ती मैदान रंगणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
![]() |
| Grand Wrestling Tournament on the Occasion of MLA Prof. Dr. Tanaji Sawant's Birthday. |
क्रिडाप्रेमींना प्रोत्साहन:-
प्रा. आ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साथुन युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके यांच्या वतीने सलग मागील तिन वर्षापासुन धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे भव्य कुस्ती स्पर्धा मैदान भरवले जाते. यामुळे परंडा भूम वाशी विधानसभा मतदार संघातील युवक, कुस्तीप्रेमी यांना मोठे प्रोत्साहन मिळते. अणेक तरूण युवक, पालक यांची आरोग्याविषयी जनजागृतीची भावना निर्माण होते. तालुक्यातील क्रिडाप्रेमींना ही कुस्ती स्पर्धा एक प्रकारे परवणीच माणली जाते. त्यामुळे आयोजकांकडून घेतल्या जाणाऱ्या या कुस्तीस्पर्धेचे कौतुकही तितकेच होते.
जय्यत तयारी :-
आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना प्रमुख राहुल डोके यांच्या वतीने या भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार उत्साह पूर्वक वातावरणात पार पाडण्यास जय्यत तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी लाल मातीच्या आखाड्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तर चार ते पाच हजार कुस्तीप्रेमी, प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी भव्य गॅलरी उभारण्यात येत आहे. यासाठी पैलवान दिलीप मोजकर यांच्या नेतृत्वाखाली मिटु आबा गोडगे, सतिश मिस्कीन, हरी घोगरे, सागर मोरे आदी परिश्रम घेत आहेत.
[ ] तरूण युवकांना आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम, सकस आहार असणे आवश्यक असून तरूणांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. तरुण पिढी सह नागरिकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी व तालुक्यातील तरुण मुलांना प्रोत्साहन मिळावे या सार्थ भावनेतून आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत. शहर व तालुका परिसरातील सर्व मल्लासह कुस्तीप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून कुस्ती स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना युवा सेना परंडा तालुकाप्रमुख तथा राहुल डोके यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!