ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आ. प्रा.डॉ. सावंत यांच्या वाढदिवसा निमीत्त गाजले जंगी कुस्त्यांचे मैदान. ... कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींचा मोठा प्रतिसाद. ... A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant.

आ. प्रा.डॉ. सावंत यांच्या वाढदिवसा निमीत्त गाजले जंगी कुस्त्यांचे मैदान. ...

कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींचा मोठा प्रतिसाद. ...

A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant.
A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant.

A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant. परंडा - रंगोली न्यूज दि. २९) माजी आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त परांडा येथे दि. २८ मार्च  रोजी लाल मातीच्या मैदानामध्ये जंगी कुस्ती स्पर्धा "Grand Wrestling Tournament" बहुसंख्य कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये तीन लाख रुपये बक्षीस असलेल्या रविराज चव्हाण व हमीद दिलावर यांच्यामध्ये झालेल्या अत्यंत अटीतटीच्या कुस्तीमध्ये रविराज चव्हाण यांनी उत्तम असा डाव करून हमीद दिलावर याला आकाश दाखवले. अशा वेगवेगळ्या कुस्त्यांसाठी भरगच्च भरलेल्या मैदानातील कुस्तीप्रेमींचे मोठे प्रोत्साहन मिळविले.

      माजी आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित साधून परंडा येथील पंचायत समितीच्या मैदानामध्ये शिवसेनेचे युवासेना प्रमुख राहुल डोके यांच्या वतीने जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्य सिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज तानाजीराव सावंत, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, केशव सावंत, विकासरत्न प्रा. डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, परंडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष जाकिर सौदागर, बाळासाहेब पडघन, उद्योजक तुकाराम (काका) साळुंके, पै. नवनाथ (आप्पा) जगताप, पै. विशाला देवकर, जि.प. सदस्य अमर मोरे, शिवसेना युवा नेते मेघराज पाटील, वाजिद दखनी, अशोक गरड, रत्नकांत शिंदे यासह परिसरातील कुस्तीप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

[ ] कुस्ती स्पर्धेत मल्लांचा सहभाग :-

A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant.
आ.प्रा.डॉ.सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्ती स्पर्धेस दुपारी ४ वाजले पासून सुरुवात झाली. यामध्ये जवळपास ७०० कुस्तीपटू सहभागी झाले होते.  ३०० हुन अधीक कुस्त्या खेळवण्यात आल्या. प्रेक्षकांचे आकर्षन ठरलेल्या प्रमुख कुस्त्यांमध्ये महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर विरुद्ध साहिल कोहली व माऊली कोकाटे विरुद्ध प्रकाश बनकर यांनी कुस्तीच्या फडामध्ये आपली चतुराई दर्शविली. या प्रमुख कुस्त्यांसाठी चार लाख रुपये चे बक्षीस ठेवण्यात आले होते. तोडीस तोडत असलेल्या या दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या व बक्षीसाची रक्कम विभागून देण्यात आली. तसेच प्रेक्षणीय लढतीमध्ये हनुमंत पुरी, विजय मांडवे व प्रशांत जगताप यांनी देखील कुस्तीचे मैदान गाजवत प्रेक्षकांची मने जिंकली.

[ ] कुस्ती मैदान यशस्वीतेचे शिलेदार :-

शिवसेनेचे युवा सेना परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके यांच्या विचारातून सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मैदानी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनासाठी दिलीप मोरजकर, कुस्ती निवेदक- राजाभाऊ देवकते, धनाजी मदने, तसेच बालाजी बुरंगे आप्पा कारंडे, राहुल भांडवलकर, बालाजी मिस्किन, मिटू आबा गोडगे, सतिश मिस्कीन, हरी घोगरे, सागर मोरे आदींनी परिश्रम घेतले.

[ ] परंडा येथील लाल मातीत महाराष्ट्र केसरी घडविण्याची ताकद! 

A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant.
A grand wrestling tournament was the highlight of the celebrations marking the birthday of Hon. Prof. Dr. Sawant.

दि. २८ मार्च २०२६ रोजी आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असलेले कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत म्हणाले की, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचे तिसरे वर्ष असून परंडा येथे जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रतीवर्षीप्रमाणे राहुल डोके व त्यांच्या सहकारी यांच्याकडून मोठे परिश्रम घेऊन अशा भव्य कुस्ती स्पर्धा भरविण्यात आल्या. महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर हे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या परंडा येथील कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. कुस्ती स्पर्धेची शोभा वाढवीत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंडा तालुक्यामधील कुस्तीप्रेमी मल्लांना यामुळे प्रोत्साहन मिळत आहे, आणि परंडा च्या मातीमध्ये अशी ताकद आहे की, जे महाराष्ट्र केसरी घडवू शकतील.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments