आ.प्रा. तानाजी सावंत यांचा अभिष्टचिंतन सोहळा. ...
Felicitations Ceremony for Hon. Prof. Tanaji Sawant. ...
![]() |
| Felicitations Ceremony for Hon. Prof. Tanaji Sawant. ... |
परंडा - रंगोली न्युज दि. १६) शिवजल हरित क्रांतीचे प्रणेते, कार्यसम्राट, माजी आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महासंघ संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुनील काकडे व आळंदी नगर परिषदेचे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा धाराशिव जिल्ह्याचे भूमिपुत्र सुरेश झोंबाडे यांच्या वतीने अभिष्टचिंतन सन्मान रूपी सोहळ्याच्या निमित्ताने आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरातील तुळशीच्या मंजुळांचा आकर्षक हार व श्री संत ज्ञानेश्वर माऊली ची उत्कृष्ट प्रतिमा देऊन, मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उद्योजक अमरनाथ ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर दादासाहेब जाधव, नरेश बर्गे, मराठवाडा सामाजिक संस्था आळंदी चे अध्यक्ष संतोष हावडे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष सहदेव सानप, व अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूर्यकांत खुडे तसेच लघुउद्योजक समुहाचे मार्गदर्शक उद्योजक मोहनजी दिपाली, मराठवाडा चेंबर्स अँड कॉमर्स असोसिएशन चे अध्यक्ष दत्तात्रेय राठोड, अमोल चौधरी, बाळासाहेब झोंबाडे, साठे तसेच उद्योजक विश्वजीत जाधव, अजित जाधव सार्थक आंबोरे, गणेश भोसले, सहकार क्षेत्रातील उच्च अधिकारी भाऊसाहेब हुंबे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित आदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शुभेच्छा देताना आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्याचा विकसित असा विकास व्हावा आणि भूम परंडा वाशी या मतदार संघाचा आदर्श मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण व्हावी. तसेच मतदारसंघातील विविध विकास कामे, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या, चालु कामावरील अधीक निधी वाटप करून युध्दपातळीवर कामे करणे आदी विषयावर आ.प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
रंगोली न्युज 👉 https://www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या. ....

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!