ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात योग-प्राणायाम सत्र संपन्न. Yoga and Pranayama Session Concluded as Part of the Pandit Deendayal Upadhyay Mega Training Campaign.

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात योग-प्राणायाम सत्र संपन्न.

Yoga and Pranayama Session Concluded as Part of the Pandit Deendayal Upadhyay Mega Training Campaign.

परंडा - रंगोली न्युज दि. ३०) परंडा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान "Pandit Deendayal Upadhyay Mega Training Campaign" २०२६ अंतर्गत दि. २९ व ३० रोजी परंडा ग्रामीण व शहर मंडल स्तरीय प्रशिक्षण वर्ग संपन झाले. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

    या प्रशिक्षण महाअभियानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये योग, प्राणायाम व सूर्यनमस्कार 'Yoga, Pranayama and Surya Namaskar' शिबिर तसेच आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता दर्शविली.

Yoga and Pranayama Session Concluded as Part of the Pandit Deendayal Upadhyay Mega Training Campaign.
Yoga and Pranayama Session Concluded as Part of the Pandit Deendayal Upadhyay Mega Training Campaign.

  याप्रसंगी भाजपा उपजिल्हाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, भाजपा परंडा ग्रामीण तालुकाध्यक्ष अरविंद रगडे व शहर प्रमुख उमाकांत गोरे यांच्यासह सर्व पदाधिकारी तानाजी पाटील, जयदेव गोफणे, गौतम लटके आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    योग सत्रामध्ये प्राणायाम व सूर्यनमस्काराचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैली बाबतचे मार्गदर्शन डॉ. आनंद मोरे (एम.डी. आयुर्वेद मेडिसिन) योगशिक्षक यांनी प्रात्यक्षिकासह केले. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक ताण कमी होतो व कार्यक्षमता वाढते, असे प्रतिपादन केले. तसेच निरोगी कार्यकर्ता हा सशक्त संघटनेचा पाया असून आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश त्यांनी दिला.

आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments