ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणीची मागणी. नगर परिषद मध्ये ठराव घ्या! आर.पी.आय. चे संजयकुमार बनसोडे यांचे नगराध्यक्ष यांना निवेदन. Demand for the erection of statues of Chhatrapati Shivaji Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar.

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणीची मागणी. 

नगर परिषद मध्ये ठराव घ्या! आर.पी.आय. चे संजयकुमार बनसोडे यांचे नगराध्यक्ष यांना निवेदन.


Demand for the erection of statues of Chhatrapati Shivaji Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar.
Demand for the erection of statues of Chhatrapati Shivaji Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar.

Demand for the erection of statues of Chhatrapati Shivaji Maharaj and Dr. Babasaheb Ambedkar. परंडा - रंगोली न्युज दि. ३०) एतिहासीक वारसा असलेल्या परंडा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळा उभारणी बाबात परंडा नगरपरिषद मध्ये ठराव घेण्याची रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे यांचे नेतृत्वाखाली दि. ३० मार्च रोजी परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

        रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज "Chhatrapati Shivaji Maharaj" यांचा परंडा शहरातील शिवाजी महाराज चौकामध्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'Dr. Babasaheb Ambedkar' यांचा परंडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पुतळे उभारण्या बाबत नगर परिषद मध्ये ठराव घेऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी. दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी महीला मेळाव्याचे निमित्ताने  तत्कालीन मुख्यमंत्री, व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तत्कालीन आरोग्य मंत्री व परंडाचे विद्यमान आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांचे शिफारशीसह, रिपब्लिकन पार्टीचे (आठवले गट) राज्य सचिव संजय कुमार बनसोडे यांचे नेतृत्वाखाली तसे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी परंडा शहरात दोन्ही महा मानवांचे पुतळे बसवण्याची जाहीर घोषणा केलेली होती. त्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी व्हावी. तसे छ्त्रपती शिवाजी महराराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याबाबतचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना निवेदन देण्यात आले. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केले नुसार पुतळा बसविण्याची सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष जाकीरभाईं सौदागर यांनी दिले.

      यावेळी रिपब्लिकन पार्टीचे  तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, माजी तालुकाध्यक्ष फकीर दादा सुरवसे, अमोल चौतमहाल, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे,  जयपाल बनसोडे, अक्षय कांबळे, विजय बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, विश्वास बनसोडे, वामन शिंदे, आकाश लोखंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments