ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भाजपा लीडर बेस नाही तर केडर बेस पार्टी - मा.आ. सुजितसिंह ठाकूर. चिंचपुर बु. येथे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप. The BJP is a cadre-based party, not a leader-based party — Hon. Ex-MLA Sujitsingh Thakur.

भाजपा लीडर बेस नाही तर केडर बेस पार्टी - मा.आ. सुजितसिंह ठाकूर 

चिंचपुर बु. येथे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचा समारोप.

The BJP is a cadre-based party, not a leader-based party — Hon. Ex-MLA Sujitsingh Thakur.
The BJP is a cadre-based party, not a leader-based party — Hon. Ex-MLA Sujitsingh Thakur.

The BJP is a cadre-based party, not a leader-based party — Hon. Ex-MLA Sujitsingh Thakur.परंडा - रंगोली न्युज दि. १) परंडा तालुक्यातील चिंचपुर बु. येथे आयोजीत कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग समारोप प्रसंगी भारतीय जनता पार्टी "राष्ट्र प्रथम" या विचार धारेवर आधारित असून भाजपा 'लीडर बेस नव्हे तर केडर बेस पार्टी' असुन कार्यकर्त्यांना सामाजिक जागरूकता, सेवाभाव आणि आपल्या कार्याची वैचारिक स्पष्टता यावी हे या प्रशिक्षणाचे उद्दीष्ट असल्याचे भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचे प्रतिपादन केले.

       "पंडीत दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान" "Pandit Deendayal Upadhyay Mega Training Campaign" अंतर्गत परंडा ग्रामीण व शहर मंडलाचे दि. २९ व ३० मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग तालुक्यातील चिंचपुर (बु.) येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या वर्गाच्या समारोप प्रसंगी मा.आ. ठाकूर हे बोलत होते. पक्षाच्या अंत्योदयाच्या धोरणानुसार केंद्र व राज्य सरकारच्या व्यक्तिगत व समुह लाभाच्या अनेक योजना असून त्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्याचे आवाहन सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर परंडा ग्रामीण मंडल अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे आणि शहर मंडल अध्यक्ष उमाकांत गोरे उपस्थित होते.

 

The BJP is a cadre-based party, not a leader-based party — Hon. Ex-MLA Sujitsingh Thakur.
The BJP is a cadre-based party, not a leader-based party — Hon. Ex-MLA Sujitsingh Thakur.

   या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून भाजपा नेते माजी आ. सुजितसिंह ठाकूर आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, भाजपा नेते गौतम लटके, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेशबप्पा खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, वर्गाचे जिल्हा संयोजक दत्ता राजमाने, शिवाजीराव गिड्डे पाटील, सचिन घोडके, जयदेवबप्पा गोफणे, अनिल पाटील, तानाजी पाटील, धनाजी गायकवाड आदी उपस्थित होते. वर्गाच्या उद्घाटनानंतर वंदेमातरम, महाराष्ट्र गीत व वर्ग गीत झाले. पहिल्या सत्रात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ‘भारतीय जनता पार्टीचा इतिहास, विचारधारा व वाटचाल’ हा विषय अभ्यासपूर्ण व प्रभावीपणे मांडला. सत्र अध्यक्ष माजी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे होते. तर दुसऱ्या सत्रात सचिन घोडके यांनी भाजपाच्या ‘सरल ॲप’ आणि ʼनमो ॲप विषयी विस्तृत माहिती दिली. सत्र अध्यक्ष गौतम लटके होते. रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य धनंजय सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.




आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments