परंडा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात उभारला शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा.
![]() |
| An equestrian statue of Chhatrapati Shri Shivaji Maharaj has been erected at Chhatrapati Shri Shivaji Maharaj Chowk in Paranda. |
An equestrian statue of Chhatrapati Shri Shivaji Maharaj has been erected at Chhatrapati Shri Shivaji Maharaj Chowk in Paranda. परंडा - रंगोलो न्युज दि. १) धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दि. १ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा "The Equestrian Statue of Chhatrapati Shri Shivaji Maharaj" शिवरायांच्या मावळ्यांनी उभा करून मागील अणेक वर्षांची सर्व शिवभक्तांची इच्छापूर्ती शिवरायांच्या मावळ्यांनी पूर्ण केली.
एकात्मकतेचे प्रतिक :-
परंडा तालुक्याला मोठा ऐतिहासीक वारसा आहे. परंडा शहरासह तालुक्यातील सर्व जातीधर्माचे नागरीक मोठ्या गुण्यागोविंदाने सर्वांबरोबर मिळुन मिसळुन राहतात. येथे हिंन्दु, मुस्लीम सन, उत्सव एकमेकामध्ये मिळुन मिसळून साजरे केले जातात. छ्त्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांचे जयंती उत्सवामध्ये सर्वच जातीधर्माचे नागरीक मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात. परंडा शहराचे ग्रामदैवत सुफी संत हजरत खाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहिद यांचा प्रतीवर्षी सर्व जातीधर्माचे नागरीक उरूसामध्ये सहभागी असतात.
शिवभक्तांची इच्छापूर्ती :-
परंडा ते बार्शी-करमाळा जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महराज चौकामध्ये दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यामध्ये सर्व जाती, धर्म, राजकिय, सामाजिक क्षेत्रातील नागरीक सहभागी होतात. या सर्व शिवभक्तांची मागील अणेक वर्षापासून जाणता राजा छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा स्थापीत व्हाव अशी इच्छा होती. ती सर्व शिवभक्तांची इच्छापूर्ती शिवरायांच्या मावळ्यांनी दि. १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पूर्ण केली.
छ्त्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांच्या मावळ्यांनी अश्वरूढ पुतळ्याचे सकाळी १० वाजता सर्व उपस्थित शिवभक्तांनी पुतळ्याला अभिवादन केले. नंतर सर्व मान्यवर व शिवप्रेमींनी परंडा पोलीस ठाणे व तहसिलदार निलेश काकडे यांना निवेदेन दिले. व पुतळा उभारल्याप्रकरणी कोणावरही गुन्हे दाखल करू नयेत. व छ्त्रजी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला रितसर मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की, आंम्ही पुढील पाच ते सहा दिवसामध्ये बैठक घेऊन पुतळे उभारणीबाबत नगर परिषदची हरकत नसले बाबतचा ठराव घेणार असल्याचे सांगीतले.
![]() |
| An equestrian statue of Chhatrapati Shri Shivaji Maharaj has been erected at Chhatrapati Shri Shivaji Maharaj Chowk in Paranda. |
शिवरायांच्या पुतळाची पुजा, पुष्पहार, फुलांची उधळन करून पुजन करून सर्व शिवभक्तांनी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर, शिवसेना (ठाकरे) चे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, भैरवनाथ तालीम संघाचे अध्यक्ष पै. नवनाथ (आप्पा) जगताप, शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, आर.पी.आय. प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, जिल्हापरिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे, राहूल बनसोड, उद्योजक रामभाऊ पवार, मेघराज पाटील, प्रशांत गायकवाड, राजेश गायकवाड, धिरज ठाकूर, मेजर महाविर तनपुरे यांच्यासह मोठ्या संखेने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींकडून छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन केले.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!