ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संत मीरा पब्लिक स्कूल परंडा येथे सोमवती जाधव चा सत्कार. Somavati Jadhav felicitated at Sant Mira Public School, Paranda.

संत मीरा पब्लिक स्कूल परंडा येथे सोमवती जाधव चा सत्कार.

Somavati Jadhav felicitated at Sant Mira Public School, Paranda.
Somavati Jadhav felicitated at Sant Mira Public School, Paranda.

Somavati Jadhav felicitated at Sant Mira Public School, Paranda. रंगेली न्युज - परंडा दि. १) संत मीरा पब्लिक स्कूल येथे  शाळेची माजी विद्यार्थिनी कु. सोमवती राजेंद्र जाधव हिची अकोला येथे पोलीस पदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने दि. १ रोजी विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. 

       या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भांडवलकर यांनी सोमवती जाधव व तिचे वडील राजेंद्र जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. सोमवती जाधव हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर पोलीस भरती परीक्षेत यश संपादन केले असून तिच्या या यशामुळे शाळेचा तसेच परिसराचा गौरव वाढला आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. 

    यावेळी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा व विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे सांगितले. सोमवती जाधव हिनेही आपल्या यशामागील मेहनत, अभ्यासाचे नियोजन आणि कुटुंबीयांचे सहकार्य याबाबत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!


Post a Comment

0 Comments