महापुरूषांच्या पुतळे उभारणी विषयी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी बोलावली सर्वसाधारसभा.
परंडा शहरांमध्ये महापुरुषांच्या पुतळा उभारणीचा ठराव मंजूर होणार?
![]() |
| Town Council President Zakir Saudagar convened a general body meeting regarding the erection of statues of eminent personalities. |
Town Council President Zakir Saudagar convened a general body meeting regarding the erection of statues of eminent personalities. रंगोली न्युज - परंडा दि. २) परंडा नगरपरिषद चे नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांनी महत्त्वाच्या विविध विषयावर चर्चा करण्यासाठी दि. ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२:३० वा. नगरपरिषद परंडा कार्यालय येथील सभागृह येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्ये परंडा शहरातील नामोल्लेखित चौकामध्ये मागील अणेक वर्षापासून महापुरुषांचे पुतळे उभारणी च्या मागण्या होत आहेत. त्यास अणूसरून विषयासह इतर विषयावर निर्णय घेणेसाठी या सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.
मागील अनेक वर्षापासून मागणी असलेल्या परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज "Chhatrapati Shivaji Maharaj" चौकामध्ये शिवप्रेमींनी दि. १ एप्रिल रोजी पहाटे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. यामध्ये एका बाजूने प्रशासनाची मोठी धांदल उडाली तर दुसरीकडे तमाम शिवप्रेमींनी पुतळा उभारणीनंतर सकाळी ११ वाजता मोठा आनंदोत्सव साजरा केला. तहसिलदार यांना निवेदन देऊन शिवप्रेमींनी उभारलेला पुतळा हटवू नये अशी मागणी केली. नंतर तहसील कार्यालयामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीची बैठक आयोजीत करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी महापुरुषांचा पुतळा उभारणीस समर्थन दर्शविले. सदरील विषयावर नगरपरिषद मध्ये लवकरच विशेष सर्वसाधारण सभा बोलावून या विषयावर निर्णय घेतला जाईल असे तहसीलदार व पोलीस प्रशासनाला सांगण्यात आले.
नगर परिषदचे सर्वसाधारण सभेचे आयोजन :-
नगराध्यक्ष जाकिर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली या सर्वसाधारण सभेचे दि. १ एप्रिल २०२६ रोजी आयोजन केले असून यामध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये परंडा शहरातील महापुरुषांचे पुतळे उभारणीसाठी परंडा नगरपरिषदेची ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विचार विनिमय करून निर्णय घेणेबाबत चा विषय सभागृहामध्ये विशेष गाजणार असून याकडे परंडा शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच इतर विषयांसह परंडा शहरांमध्ये अभय योजना लागू करणे या विषयावर देखील चर्चा होणार असल्याचे सांगीतले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!