ताज्या घडामोडी

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जि.प. सभापती विश्वास कोकणे यांनी सुजितसिंह ठाकूर यांची घेतली भेट. ठाकूर यांच्याकडून विश्वास कोकणे यांचा सत्कार व शुभेच्छा! Zilla Parishad Chairman Vishwas Kokane met with Sujitsingh Thakur.

जि.प. सभापती विश्वास कोकणे यांनी सुजितसिंह ठाकूर यांची घेतली भेट. 

ठाकूर यांच्याकडून विश्वास कोकणे यांचा सत्कार व शुभेच्छा!

Zilla Parishad Chairman Vishwas Kokane met with Sujitsingh Thakur.
Zilla Parishad Chairman Vishwas Kokane met with Sujitsingh Thakur.

Zilla Parishad Chairman Vishwas Kokane met with Sujitsingh Thakur. रंगोली न्युज परंडा दि. २) भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व धाराशिव जिल्हा परिषदचे समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालय येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली याप्रसंगी ठाकूर यांनी सभापती कोकणे यांचा फेटा बांधून व शाल व पुष्पहार देऊन सत्कार व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

     यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, शिवाजीराव पाटील, सोशल मिडिया तालुका संयोजक तुषार नेटके, सनी अहिरे, नागेश मिसाळ तसेच खामसवाडी येथील भाजपा नेते अनिल शेळके, सादिक सय्यद, राजेश गरड आदी उपस्थित होते.

        कसलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी "Political Background" नसलेल्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पक्षाने उमेदवारी आणि सभापतीपदाची मोठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार व्यक्त केले. विश्वास कोकणे यांचा असलेला जनसंपर्क, कार्य आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे ते जिल्हा परिषदेत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. यावेळी त्यांनी ठाकूर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. आणि लोकाभिमुक पारदर्शी कारभार करून समाजकल्याण विभागाच्या असलेल्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विश्वास व्यक्त केला. कोकणे यांनीही ठाकूर यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.



आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी 

👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!

Post a Comment

0 Comments