वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या दगावल्या.
पशुपालकाचे सुमारे ५० हजार रू. चे नुकसान.
रंगोली न्युज - परंडा दि. २)
Three goats died in an attack by wild animals.
Three goats died in an attack by wild animals. धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहराच्या शिवारातील परंडा ग्रामीण भागातील मोहन रामदास धनवडे यांच्या शेतातील तीन शेळ्या "Goats" अज्ञात वन्य प्राण्यांनी खाल्ल्या आहेत. या शेळ्या जागेवरच दगावल्या असून अज्ञात वन्य प्राण्यांनी शेतकऱ्याचे मोठे नुकसान केलेले आहे.
देवगाव रोड परांडा शिवारात मोहन धनवडे हे शेतामध्ये राहत असून दि. २ एप्रिल च्या पहाटे अंदाजे ३:३० वाजल्यानंतर अज्ञात वन्य प्राण्याने शेळ्यांचा फडशा पडलेला आहे. वन्यप्राणी कोणता होता हे स्पष्ट सांगता येत नसल्याने प्रथमदर्शनी बिबट्याने किंवा लांडग्याने शेळ्या खाल्या असा अंदाज येत आहे. यामध्ये १ शेळी तसेच २ बोकडांचा समावेश आहे.
दरम्यान वनपरिक्षेत्र, पशुवैद्यकीय तसेच तलाठी कार्यालयाचे अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला व वरिष्ठ कार्यालयास तसा अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्याचे (पशुपालकाचे) सुमारे ५० हजार रू. चे नुकसान झालेले असून शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व इतर घडामोडी 🤳 पहाण्यासाठी
👉 रंगोली न्युज 👉 www.rangolinews1.com या संकेतस्थळाला भेट द्या!
0 Comments
रंगोली न्युज1 ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपल्या संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तीक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातम्या, प्रसारित माहीती, योजनेबद्दल क्वेरी किंवा संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या बातम्या, माहितीसाठी संबंधित विभागाच्या Official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आम्ही विनंती करतो. रंगोली न्युज1 मधून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीतील मजकुर शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्याची रंगोली न्युज1 कोणतीही हमी घेत नाही. रंगोली न्युज1 वरील माहीती कॉपी करू नये किंवा इतरत्र वापरू नये. यावरील प्रकाशित झालेले सर्व मजकूर, लेख व त्याचे हक्क रंगोली न्युज1 व संबंधीत लेखकाकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी रंगोली न्युज1 सहमत सहमत असेलच असे नाही. जाहीरातीत करण्यात आलेल्या दाव्याची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास रंगोली न्युज1 जबाबदार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!